महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganeshotsav 2021 : अष्टविनायकापैकी एक आहे रांजणगावचा महागणपती; जाणून घ्या काय आहे इतिहास - गणेशोत्सव 2021

रांजणगावचा महागणपती अष्टविनायकांपैकी चौथा गणपती मानला जातो. या गणपतीला महागणपती म्हणून संबोधण्यात येते. या गणपतीचे स्वयंभू स्थान नगर-पुणे महामार्गावर शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे आहे.

ranjangaon mahaganpati temple
ranjangaon mahaganpati temple

By

Published : Sep 16, 2021, 6:03 AM IST

पुणे -अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगावात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. ही मूर्ती स्वयंभू असल्याने 'एक गाव एक गणपती'ची स्थापना केली जाते. भाद्रपद गणेशोत्सवात सुरुवातीचे पाच दिवस मुक्तद्वार दर्शन व जलाभिषेक केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे रांजणगाव गणपतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गणेशोत्सव परंपरेनुसार मर्यादित लोकांच्या उपस्थित यंदाचा सोहळा पार पडण्यात येतो आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील महागणपतीच्या मंदिरात भाद्रपद गणेश उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरो होतो. पारंपरिक पद्धतीने पार पडणाऱ्या या सोहळ्यात दरवर्षी भाविकांची गर्दी होते. कीर्तने-भजने व अन्तय धार्मिक अधिष्ठान करण्यात येते. मात्र, यंदा उत्सवाचा जोर ओसरला आहे.

प्रतिक्रिया

माधवराव पेशव्यांनी साकारले पेशवेकालीन बांधकाम -

रांजणगावचा महागणपती अष्टविनायकांपैकी चौथा गणपती मानला जातो. या गणपतीला महागणपती म्हणून संबोधण्यात येते. या गणपतीचे स्वयंभू स्थान नगर-पुणे महामार्गावर शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे आहे. या महागणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे भाद्रपद महिन्यात घरोघरी गणेशाची स्थापना न करता 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना रांजणगाव महागणपती पाहायला मिळते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान मानल्या जाणाऱ्या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीने करण्यात आले आहे. रांजणगाव महागणपतीचा जीर्णोद्धार माधवराव पेशव्यांच्या काळात करण्यात आल्याच्या इतिहासात नोंदी आढळतात. मंदिराचे स्थान इसवीसन दहाव्या शतकातील आहे. हे संपूर्ण क्षेत्र भगवान शंकरांनी प्रस्थापित केले असून गणेश मूर्तीची स्थापना केल्याची अख्यायिका सांगितली जाते.

हेही वाचा -Ganeshotsav 2021 : असा आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचा इतिहास, वाचा....

गणेशाच्या बहिणी आणि चार पालख्यांची प्रथा -

रांजणगाव महागणपती येथे गेल्या अनेक वर्षांपासून 'एक गाव एक गणपती' ही परंपरा चालू आहे. भाद्रपद गणेश उत्सवात महागणपतीच्या चारही दिशांना असलेल्या बहिणींचा पालखी सोहळा महागणपतीच्या दर्शनाला येत असतो. यामध्ये करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव व ढोकसांगवी या चार गावांतून भाविक अनवाणी यात्रा काढतात. चार दिवस चालणाऱ्या या द्वारयात्रेत हजारो भाविक सहभागी होत असतात. चारही बहिणींचा पालखी सोहळा हा रांजणगाव महागणपती दाखल झाल्यानंतर गणेशोत्सव सोहळ्याला सुरुवात होते. पालखी सोहळ्यात आजही परंपरागत याच मूर्तीची प्रतिष्ठापना होते.

सूर्याची किरणे थेट महागणपतीवर -

या मंदिराच्या उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. पेशव्यांनी या मंदिराला मोठ्या देणग्या दिल्या. तसेच बांधकामही हातात घेतले. यानंतर मोठा नगारखाना मंदिराच्या आवारात बांधण्यात आला.

हेही वाचा -Ganeshotsav 2021 : पालीच्या गणपतीला बल्लाळेश्वर नावाने का ओळखलं जातं? जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details