पुणे :गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरगाठीचे देखील विशेष महत्त्व आहे. घरातील लहान मुलांना या साखरगाठींचा हार आवर्जून दिला जातो. पुण्यातील भवानी पेठ येथे गणेश डिंबळे यांचा वडिलोपार्जित कारखाना आहे. यात ते साखर गाठ आणि तिळगुळ बनवत असतात. दरवर्षी महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर साखरगाठी ही बनवली जाते. साखर गाठ कशी बनवतात? तर एक सागवानी लाकडाचे साचे असतात, त्या साच्यामध्ये नकशी ही पहिल्यापासूनच कोरलेली असते. यात दोरा लावून तयार केलेला साखरेचा पाक हे टाकण्यात येतो. काही वेळाने नक्षीदार पांढरी शुभ्र अशी साखरगाठ ही तयार होते. जरी पद्धत सोपी असली तरी हे तयार करण्यासाठी खूप मेहनत असते. कामगार हे लवकर भेटत नाही. जास्त करून यामध्ये बाहेरील राज्यातील कामगार हे आपल्याला काम करताना पाहायला मिळतात.
यंदा मोठ्या प्रमाणावर मागणी :हा साखर गाठीचा व्यवसाय आमच्या वडिलोपार्जित व्यवसाय आहे. गेल्या 40 ते 50 वर्षापासून आमचा हा व्यवसाय असाच सुरू आहे. कोरोनामुळे सर्वानाच आर्थिक फटका बसला. आम्हाला देखील याचा मोठा आर्थिक फटका बसला होता. पण यंदा मोठ्या प्रमाणावर धंदा आहे. दरोरोज 300 किलो गाठी हे यंदा दरोरोज विकले जात आहे. तसेच बाजारात मागणी देखील जास्त असल्याचे यावेळी गणेश डिंबळे म्हणाले.