पुणे (राजगुरुनगर)-पारनेर तालुक्यातील निघोज गावात दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण केल्याची घटना घडली. हे सदस्य आणि काही गावकरी ओतूर येथे देवदर्शनासाठी जात असताना हा प्रकार घडला. दिगंबर भागाजी लळागे आणि गणेश दत्तू कवादया असे अपहरण करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत. या प्रकरणी निघोज गावातील २५ जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे; फिल्मी स्टाईलने निघोजच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण - निघोज ग्रामपंचायत सदस्य अपहरण न्यूज
निघोज ग्रामपंचायतीचे नवनिवर्वाचित सदस्य आणि काही गावकरी ओतूर येथे देवदर्शनासाठी जात होते. वाटेत ते खेड घाटाजवळ जेवण करण्यासाठी थांबले असताना अचानक आलेल्या २५ जणांच्या टोळक्यांनी तलवार आणि काठ्यांचा धाक दाखवत दोन ग्रामपंचायत सदस्यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण केले.
फिल्मी स्टाईलने अपहरण
निघोज ग्रामपंचायतीचे नवनिवर्वाचित सदस्य आणि काही गावकरी ओतूर येथे देवदर्शनासाठी जात होते. वाटेत ते खेड घाटाजवळ जेवण करण्यासाठी थांबले असताना अचानक आलेल्या २५ जणांच्या टोळक्यांनी तलवार आणि काठ्यांचा धाक दाखवत दोन ग्रामपंचायत सदस्यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण केले. या प्रकरणी विठ्ठल भाऊसाहेब कवाद यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून निघोजच्या २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.