खेड (पुणे) -खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांना अटक करण्यात आली आहे.खेड पंचायत समितीच्या 11 सदस्यांनी एकत्र येत सभापती भगवान पोखरकर यांच्याविरूध्द अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर डोणजे येथील रिसॉर्टमध्ये घुसून शिवसेनेच्या खेड पंचायत समिती सदस्य व त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपही भगवान पोखरकर यांच्यावर करण्यात आला. याप्रकरणी भगवान पोखरकर व त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्याचे पती केशव अरगडे यांना अटक करण्यात आली. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोखरकर यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यावर हल्ला करून गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अनेक गुन्हे दाखल
प्रसाद काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, भगवान नारायण पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे यांच्यासह 15 ते 20 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगून गोळीबार करणे, विनयभंग, अपहरण, हॉटेलमध्ये जबरदस्तीने घुसून तोडफोड करणे असे गुन्हे हवेली पोलीस ठाण्यात दाखल केलेले आहेत.