पुणे- श्री श्री 1008 खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांच्या भक्तांनी शंख ढाल व विशाल भंडारा महासभेचे आयोजन केले. गोरक्षनाथ टेकडी येथील खेथानाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते अवसरी फाटा येथील गोरक्षनाथ टेकडीवर या सोहळ्याला सुरुवात झाली.
गोरक्षनाथ मंदिरात होम-हवन करून खेथानाथजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पालखी सोहळ्याची मिरवणूक निघाली. यावेळी देशभरातून अनेक नाथपंथी साधू संत तसेच महंतांनी हजेरी लावली.