महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोरांचे गाव..! पालक बनून ग्रामस्थ करतात मोरांचे संगोपन - पाणी

शिरुर परिसर मोरांचे 'माहेरघर' माणलं जातो.

मोरांचे गाव..! पालक बनून ग्रामस्थ करतात मोरांचे संगोपन

By

Published : May 6, 2019, 11:50 AM IST

Updated : May 6, 2019, 1:22 PM IST

पुणे - डोलदार डोक्यावरचा तुरा...तर लांबलचक पंखांचा पिसरा त्यातून उगवत्या सुर्याची साक्ष देत मोरांची आरोळी हे सारं मन सुन्न करुन टाकणारं असतं म्हणुन हा मोर देशाचा राष्ट्रीय पक्षी बनला. शिरुर तालुक्यातील खैरेवाडी या गावात प्रत्येक कुटुंबातील नागरिक आता या मोरांचे पालक बनुन मोरांचे संगोपन करु लागले आहेत.

माहिती देताना ग्रामस्थ
पुणे जिल्हातील शिरुर तालुक्यातील पश्चिम भाग जास्त दुष्काळी भाग म्हणुन पाहिला जातो. हाच परिसर मोरांचे 'माहेरघर' माणलं जाते. या गावांत मोर प्राचीन काळापासून आपलं वास्तव्य करतात, याच मोरांना पाहण्यासाठी जगभरातून नागरिक या ठिकाणांना भेट देत असतात. तर त्या परिसरातील नागरिकही आपल्या घरचा सदस्य समजून त्याला अन्नधान्य पाण्याची सोय करुन देतात. त्यामुळे हा देशाचा राष्ट्रीय पक्षी आता लोकवस्तीत येऊन माणसांमध्ये रमून गेला आहे. मात्र वनविभागकडून कुठलेच उपाययोजना केल्या जात नसल्याची खंत नागरिकांच्या मनात आहे.


सकाळी उगत्या सुर्याच्या आगमनात मोरांचा आवाज संपुर्ण परिसरात घुमतो. रमतगमत मोरांचे टोळगं लोकवस्तीत येत भटकंती करतात, डोंगरद-या व मोकळ्या माळरानांवर फिरत आपला चारा शोधत हे मोर दिवभर भटकंती करत असतात. त्यातच सद्या उन्हाचा पारा वाढल्यानं या मोरांचे जनजीवन धोक्यात आल्याचे गावाकरी सांगतात.


उन्हाळा आला की मोर आपला चारा शोधत लोकवस्ती व हिरवळ शेतीकडे जात असतात. दिवसभर सुंदर जंगलात फिरणारा हा पक्षी आता अन्नाच्या व्याकुळतेने लोकवस्तीत फिरत आहे. त्यात तो लोक वस्तीत येऊ लागल्याने नागरिकही त्यांना आपुलकीने स्विकारतात. मात्र मोरांचे आस्तित्व टिकवायचे असेल तर या मोरांना त्यांच्या मुळच्या ठिकाणीच अन्न-पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. तरच मोराचे आस्तिव ख-या अर्थाने टिकणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


दुष्काळात होरपळत असणा-या या परिसराला मोरांच्या आस्तित्वाच एक वेगळं योगदान लाभलं आहे. या परिसरातील नागरिकही मोरांचे संगोपन अगदी आपल्या बाळाप्रमाणे करत आहेत. देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या या मोरांच्या उपजिविकेकडे शासनाकडुन दुर्लक्ष होत आहे.

Last Updated : May 6, 2019, 1:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details