पुणे- अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री महादेव सेल्स आणि कॉर्पोरेशन या खाद्य तेलाच्या गोडाऊनवर छापा टाकला. भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. यावेळी अंदाजे २ लाख रुपये किमतीचे विविध प्रकारचे गोडेतेल जप्त करण्यात आले.
पुण्यात खाद्यतेल विक्री करणाऱ्या दुकानावर 'एफडीए'चा छापा, साध्या तेलाची नामांकित ब्रँडच्या नावाखाली विक्री - eating oil
अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री महादेव सेल्स आणि कॉर्पोरेशन या खाद्य तेलाच्या गोडाऊनवर छापा टाकला. भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली.

या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मार्केट यार्डमधील श्री महादेव सेल्स आणि कॉर्पोरेशन या खाद्य तेलाच्या गोडाऊनमध्ये दर्जाहीन खाद्य तेलाच्या डब्यावर किर्ती ऑईलचे स्टिकर चिटकवून ते बाहेर चढ्या किमतीने विकले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले आहे. हे सर्व खाद्य तेलाचे डबे जप्त करण्यात आले आहेत. यासंबधी पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन करत आहे.