महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Keshar Farming In Pune : पठ्ठ्यानं कर्करोगावर मात करत सुरू केली 'केशर'ची शेती, आता मिळवतोय लाखोंचं उत्पन्न! - पुण्यात केशरची शेती

Keshar Farming In Pune : तळेगाव दाभाडे येथील गौतम राठोड यांनी कर्करोग झाला असतानाही खचून न जाता केशरची शेती करण्याचा निश्चय केला. त्याचं फळ आता त्यांना मिळतंय. केशरच्या शेतीतून ते आता लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. वाचा ही स्पेशल स्टोरी...

Keshar Farming In Pune
Keshar Farming In Pune

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 8:20 PM IST

पाहा व्हिडिओ

पुणे Keshar Farming In Pune : केशरचं उत्पादन साधारणपणे काश्मीरमध्ये होतं. मात्र हळूहळू महाराष्ट्रातही आधुनिक पद्धतीची केशर शेती केली जात आहे. आता पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे एका युवकानं केशरच्या शेतीला सुरुवात करून सर्वांनाच आश्चर्य चकित केलंय.

कर्करोग झाला, तरी खचले नाही : ४५ वर्षीय गौतम राठोड यांनी कर्करोग झाला असतानाही खचून न जाता केशरची शेती करण्याचा निश्चय केला. त्याचं फळ आता त्यांना मिळतंय. केशरच्या शेतीतून ते आता लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. गौतम राठोड यांनी सुमारे २० वर्ष एका गॅरेजमध्ये काम केलं. दरम्यान, त्यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर त्यांनी केशरची शेती सुरू केली. आता त्यांच्या केशरला तब्बल ८०० रुपये प्रति ग्राम पर्यंत भाव मिळतोय!

कर्करोगावर मात केली : गौतम राठोड यांचं कुटुंब मूळचं अहमदनगर जिल्ह्यातील. २२ वर्षांपूर्वी ते रोजगारासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथं आलं. गौतम राठोड यांनी बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मेकॅनिकल फिल्डमध्ये काम सुरू केलं. त्यांनी तळेगाव येथे स्वतःचं गॅरेज सुरू केलं. जवळपास २० वर्ष गॅरेजमध्ये काम केल्यानंतर त्यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यांनी कर्करोगाशी लढा देत त्यावर मातही केली. मात्र दरम्यान त्यांची उजवी किडनी निकामी झाली. त्यामुळे त्यांना अवजड काम करणं अशक्य झालं.

व्हर्टिकल फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला : सुमारे सहा महिने बेड रेस्ट घेतल्यानंतर गौतम यांनी व्हर्टिकल फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला. चांगलं तंत्रज्ञान वापरून बागायती शेती करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी एरोफोनिक पद्धतीनं शेती करण्याचं ठरवलं. गौतम यांनी केशर शेतीचा अभ्यास करत संशोधन सुरू केलं. यासाठी ते विविध कार्यशाळेत सहभागी झाले. त्यांनी केशर लागवडीचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर घराच्या छतावरच केशरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी व्हर्टीकल फार्मिंगद्वारे केशर लागवडीसाठी वातावरण तयार केलं.

काश्मीरमधून बियाणं मागवलं : गौतम राठोड यांनी जुलै २०२३ मध्ये काश्मीरमधून अडीच किलो केशरचे बियाणं ४५० रुपये किलो भावानं मागवले. त्यानंतर त्यांनी घराच्या छतावर केशर शेतीसाठी एक खोली बनवून त्यामध्ये काश्मीरसारखं वातावरण तयार केलं. तेथे त्यांनी केशरच्या बियाणांची आधुनिक पद्धतीनं लागवड केली. पिकाला जे हवं ते केवळ हवेच्या माध्यमातून दिलं गेलं. यामध्ये त्यांना हळूहळू यश मिळायला लागलं.

काश्मीर प्रमाणेच उत्तम दर्जाचं केशर पिकवलं : ऑक्टोबर महिन्यात हे केशरचं पीक विक्रीसाठी तयार झालं. सध्या बाजारात १२ ते १३ मिलीमीटर लांबीच्या केशरला ८०० रुपये प्रती ग्रॅम एवढा भाव असून, तुकडा केशर ४०० रुपये प्रती ग्रॅम प्रमाणे विकलं जातंय. आता या दर्जेदार केशरच्या विक्रीसाठी परवाना काढणार असल्याचं गौतम राठोड यांनी सांगितलं. आपल्या या प्रयोगाद्वारे, काश्मीर प्रमाणेच उत्तम दर्जाचं केशर तळेगाव दाभाडे येथेही बनवणं शक्य असल्याचं या अवलियानं सिद्ध केलंय.

हेही वाचा :

  1. Folding Electric Cycle : पुण्यातील प्राध्यापकानं बनवली संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल!
  2. marigold farming story : सोनेरी झेंडूची शेती ठरतेय लाख मोलाची; वाचा गंगापूरातील शेतकऱ्याची कहाणी

ABOUT THE AUTHOR

...view details