पुणे - कसब्यात 45.25 तर चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदान झाले आहे. आता निकालाची उत्सुक्ता लागली आहे.
Kasba Chinchwad Bypolls : मतदान संपले; कसब्यात 45.25 तर चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदान - महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणूक २०२३
18:45 February 26
मतदान संपले; कसब्यात 45.25 तर चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदान
18:33 February 26
विनोबा भावे प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर गोंधळ, मशीन स्लो केल्याचा काँग्रेसचा आरोप
पुणे:कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपलेली असून, साडेपाच नंतर विनोबा भावे प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी झाली होती. मतदान प्रक्रिया यंत्रणेकडून मुद्दाम स्लो करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालयातील मतदान बुधवर अनेक नागरिकांना मतदानाविना परत जावे लागले आहे.
17:54 February 26
कसबा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
पुणे - 5 वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात 45 टक्के मतदान झाले आहे.
17:21 February 26
आजारी असतानाही खासदार गिरीश बापट यांनी केले मतदान
पुणे-आजारी असतानाही खासदार गिरीश बापट यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
15:55 February 26
कसबा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 30.05 टक्के मतदान
पुणे - कसबा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 30.05 टक्के मतदान झाले आहे.
15:28 February 26
कसब्यातील वातावरण तापले; भाजपच्या गणेश बीडकरांचा काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला
पुणे -भाजपच्या गणेश बीडकरांचा काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला. कसबा मतदार संघातील माल धक्का चौकातील अशोक कॅाम्प्लेक्समधील धटना. गणेश बीडकर भाजप कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पैसे वाटप करत असल्याचा काँग्रेसचा आरोप. मारहाणीनंतर काँग्रेस कार्यकर्ते समर्थ पोलीस स्टेशनला जमा.
12:31 February 26
सकाळी 11 पर्यंत कसबा 8.25 टक्के तर चिंचवड मतदार संघात 10.45 टक्के मतदान...
पुणे :सकाळी 11 पर्यंत कसबा 8.25 टक्के तर चिंचवड मतदार संघात 10.45 टक्के मतदान...
10:02 February 26
सकाळी ९ पर्यंत कसब्यात ६.५ टक्के तर चिंचवडमध्ये ३.५२ टक्के मतदान
पुणे : सकाळी ९ पर्यंत कसब्यात ६.५ टक्के तर चिंचवडमध्ये ३.५२ टक्के मतदान झाले आहे.
09:19 February 26
कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी बजावला मतदानाचा हक्क
पुणे :कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी बजावला मतदानाचा हक्क
09:08 February 26
चिंचवडमध्ये मतदानाला गालबोट.. मतदान केंद्राबाहेर जोरदार राडा
पुणे :
- चिंचवडमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा
- माजी नगरसेवक अंघोळकर आणि उमेदवार कलाटे यांच्या समर्थकांमध्ये झटापट झाल्याची प्राथमिक माहिती
- पिंपळे गुरव मतदान केंद्राबाहेर राडा झाल्याची माहिती
07:09 February 26
कसबा- चिंचवडमध्ये मतदान सुरु.. भाजप जागा टिकविणार की महाविकास आघाडीची होणार सरशी?
कसबा- चिंचवडमध्ये मतदान सुरु.. भाजप जागा टिकविणार की महाविकास आघाडीची होणार सरशी? याबाबत उत्सुकता आहे.
07:01 February 26
कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
पुणे : कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
06:29 February 26
कसबा पेठ पोटनिवडणूक मतदान अपडेट्स, पिंपरी- चिंचवड पोटनिवडणूक मतदान अपडेट्स Kasba Peth Bypolls Voting Pimpri-Chinchwad Bypolls Voting Live Updates 2023 Maharashtra Politics
कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी या पेजला रिफ्रेश करत राहा
पुणे:कसबा विधानसभेसाठी आज मतदान होणार असून, यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे. या कसबा पेठ मतदारसंघात दोन लाख 75 हजार 428 इतके मतदार असून, 270 मतदान केंद्रावर त्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून 1200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पोटनिवडणुकीसाठी प्रचारचा कालावधी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संपला. कसब्यातून निवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दोन लाख 75 हजार 428 मतदार 270 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
हायव्होल्टेज राजकारण पाहावयास मिळत असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाल्याने जागा रिक्त झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती. या पोटनिवडणूकीसाठी भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
हेही वाचा: चिंचवड पोटनिवडणूक; मतदारसंघाचा 'असा' आहे इतिहास...
तर पिंपरी-चिंचवड मतदारसंघात भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवणूकीसाठी महाविकास आघाडीकडून बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता निवडणूकीत तिरंगी लढत होत आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे उमेदवार उभे आहेत.