पुणे: बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कार्यक्रमाच पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. या निमित्ताने इच्छुक उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट घेतली. रविवारी रात्री कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आज पक्षाचे नेते यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यात येणार आहे. मागील तीस वर्षापासुन राजकीय जीवनात असून कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मला जर उमेदवारी दिल्यास तेथूनच कसबा मतदारसंघात विजयाची नांदी सुरू होईल, असा विश्वास यावेळी धंगेकर याने व्यक्त केला.
जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा:काँग्रेस पक्षाकडून अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. तसेच इच्छुकदेखील अधिक असून तुम्हाला उमेदवारी नाकारल्यास बंडखोरी करणार का? त्या प्रश्नावर ते म्हणाले की, अपक्ष निवडणूक लढविणे सोपे नाही. पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील बैठकीत सांगितल आहे की, सर्वांना एकमताने काम करायचे आहे. व आम्ही आमच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली आहे. भाजपकडून कसबा पोटनिवडणकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.