महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kasba By Poll Election : कसबा भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती; चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित - कसबा पोटनिवडणूक

कसबा पोटनिवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीकडून हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरत आहेत. कसबा गणपती दर्शन घेऊन त्यानंतर त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन आरती केलेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत.

Kasba By Poll Election
हेमंत रासने यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती

By

Published : Feb 6, 2023, 12:14 PM IST

पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज दोन्ही पक्षांकडून अर्ज भरण्यात येणार आहेत. भारतीय जनता पार्टीकडून हेमंत रासने हे उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून नुकतेच उमेदवारी जाहीर झालेले रविंद्र धंगेकर हे अर्ज भरणार आहेत. हेमंत रासने हे दगडूशेठ मंदिराचे विश्वस्तसुद्धा आहेत. दर्शन घेऊन ते आता उमेदवारी अर्ज भरत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात, गर्दीत आणि त्याचबरोबर देवदर्शन करून हेमंत रासने आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

राजकीय चर्चेला उधाण :कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे देखील दर्शन घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालक मंत्री चंद्रकांत पाटील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते, पण आमदार मुक्ता टिळक यांचे कुटुंबीय तसेच इच्छुक उमेदवार धीरज घाटे हे अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.



निवडणूक बिनविरोध व्हावी : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत जर महाविकास आघाडीचे उमेदवार नसेल, तर घरातल्या लोकांना उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी त्याबाबत विचार करतील. ही भूमिका पक्षाला मान्य आहे. महाविकास आघाडीने जर कळवले, तर उद्याचा दिवस आमच्याकडे शिल्लक आहे. तशा पद्धतीचा आम्ही निर्णय देखील घेऊ. आज मी आपल्या माध्यमातून देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन करत आहे की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करू. आम्ही घरच्यांना उमेदवारी देण्यासाठी त्या पद्धतीचा देखील निर्णय घेऊ, असे देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.



ब्राह्मण समाजात नाराजी : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाजात नाराजी आहे. तशा पद्धतीचे पोस्टर कसबा मतदारसंघात देखील आलेले आहे. यावर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणीही कोणाला डावलत नाही. ब्राह्मण समाजाने तर पक्षासाठी आपला आयुष्य दिलेले आहे. तसेच सर्व समाजाचे लोक देखील काम करत आहे. कुठल्याही जातीवर किंवा समाजावर भाजप अन्याय करत आहे, असे नाही. जेव्हा जेव्हा, वेळ आली तेव्हा तेव्हा समाजाला पक्षाने खूप काही दिलेले आहे. कारण या समाजाने पक्षासाठी खूप काही केलेले आहे.




निवडणुकीसाठी तयारी : यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही जगताप यांच्या घरातही उमेदवारी दिली आहे. मग काँग्रेस तिथेही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का? मुळात काँग्रेसला पुण्यातील दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही. त्यामुळेच नाना पटोले यांनी हे विधान केले आहे. माझे नाना पटोलेंना आव्हान आहे की, निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिकळांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे घोषित करावे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच नाना पटोले जे म्हणत आहे, ते न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. आम्ही या निवडणुकीसाठी तयारी केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.



सर्वजण एकमताने काम करणार : यावेळी कसबा पोटनिवडणुकीचे ते इच्छुक उमेदवार आहे. मात्र ते असे म्हणाले की, पक्षाकडे गेल्या पंधरा वर्षापासून उमेदवारी मागत होतो, आज पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षात कोणीही नाराज नाही. आम्ही सर्वजण एकमताने काम करणार आहोत, मोठ्या मताने मी निवडणूक जिंकणार आहे, असे देखील यावेळी हेमंत रासने म्हणाले.

हेही वाचा : Kasba and Chinchwad By Poll Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; निवडणूक बिनविरोध होणार का?

ABOUT THE AUTHOR

...view details