पुणे:कल्याण येथून भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाची बस आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे असणाऱ्या ओढ्यावरून बस थेट वीस फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण ३५ प्रवाशी प्रवास करत होते. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघातात घडला आहे.
कल्याण येथून भीमाशंकर येथे निघालेल्या बसला आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावाजवळ असणाऱ्या ओढ्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस वीस फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. तर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. जखमी पैकी दोन जणांना गुडघ्याला लागलं असल्याने त्यांना तत्काळ दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी तात्काळ दाखल झाले. पाच रुग्णवाहिकांनी जखमींना घोडेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गाडी पलटी झाल्याने हा अपघात-गीरवली गावामध्ये हे बस उलटल्याची माहिती 108 क्रमांकावर नियंत्रण कक्षाला मिळालेली होती. जिल्हा प्रशासनाकडून पाच रुग्णवाहिका अपघात स्थळी पाठवण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाकडून सर्व उपयोजना करण्याचे काम चालू आहे. जखमी प्रवाशांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर प्रवासी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे .नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीनंतर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने अपघात स्थळी मदत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गाडी पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताचे नेमके कारण जिल्हा प्रशासनाला किंवा कुणालाही समजू शकले नाही. परंतु तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आलेली आहे. अधिक माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.