पुणे :शनिवारी पुण्यात धर्मजागरण सभेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कालीचरण महाराज हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आधी त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिव समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक दीपक नागपुरे, अली दारुवाला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाबाबत म्हणताना कालीचरण महाराज म्हणाले की, या सभेचा उद्देश जात, भाषा, प्रांत अशा वादांमध्ये अडकलेल्या हिंदू धर्मातील लोकांना एकत्र आणणे आहे. कट्टर हिंदू व्होट बँक बनविणे, पण आज देशात हिंदू व्होटर बँक बनविण्यात सर्वाधिक समस्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये असलेल जातीवाद आहे.
हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न :आज हिंदूंमध्ये जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद हे प्रामुख्याने भारतात पाहायला मिळत आहे. जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मध्वजाखाली एकत्र येऊ देत नाही. आज आम्ही अश्या सभा ठिकठिकाणी घेऊन या सर्वातून हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे, असेही यावेळी कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. यावेळी मंदिरांच्या बाबतीत म्हणताना कालीचरण महाराज म्हणाले की, ताजमहालची आतील बाजू पाहायला देत नाही. तयखाना का बंद केले आहे? आज आपण पाहिले तर कुतुबमिनार हे 27 हिंदू जैन मंदिरांना तोडून बनविण्यात आले आहे. याचे प्रमाण देखील आर्कोलोजी येथे आहे. 5 लाख हिंदू मंदिरे तोडून वेगवेगळ्या ठिकाणी स्मारक बनविण्यात आले आहे. आत्ता जर या देशाचा राजा हे तोडून हिंदू मंदिर जर बनवत असेल, तर त्यात वाईट काय आहे? असे देखील यावेळी महाराज म्हणाले.