महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

न्यायमूर्ती पी.बी. सावंत म्हणजे आदर्श माणसाचे उत्कृष्ट उदाहरण - बी.जी कोळसे पाटील - P.B. kolse Patil reaction

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केले. वकिली, न्यायमूर्ती, सार्वजनिक जीवन किंवा कौटुंबिक जीवन असो, कुठल्याही परिस्थितीत त्यांनी एका शब्दानेही तडजोड केली नाही. आदर्श माणूस कसा असावा, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पी.बी सावंत, अशा शब्दात माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील यांनी पी.बी सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.

Justice P.B. Sawant
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत

By

Published : Feb 16, 2021, 3:21 PM IST

पुणे -माजीन्यायमूर्ती पी.बी. सावंत आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केले. वकिली, न्यायमूर्ती, सार्वजनिक जीवन किंवा कौटुंबिक जीवन असो, कुठल्याही परिस्थितीत त्यांनी एका शब्दानेही तडजोड केली नाही. आदर्श माणूस कसा असावा, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पी.बी सावंत. कधी नव्हे ते देशात उभे राहिलेल्या शेतकरी आंदोलनाला सर्वांनी जात-धर्म विसरून पाठिंबा द्यावा, हीच न्यायमूर्ती पी.बी सावंत यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील यांनी पी.बी सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया देताना माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील

हेही वाचा -'ईटीव्ही भारत विशेष' कलम 370 हटवल्यानंतर 'असे' बदलले जम्मू काश्मीर

माजी न्यायमूर्ती पी.बी सावंत यांचे काल सकाळी निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. सावंत यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सकाळी सावंत यांच्या घरी उपस्थित होते. त्यांनी सावंत कुटुंबाचे सांत्वन करत श्रद्धांजली वाहिली.

1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. बॉम्बे विद्यापीठातून त्यांनी लॉची डिग्री मिळवल्यानंतर (एलएलबी) सुरुवातीला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर भारतीय सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून सराव सुरू केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी.

1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले. येथे त्यांनी अनेक प्रकरणे हाताळली. नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी १ सप्टेंबर २००३ रोजी पी.बी सावंत आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सावंत या आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी आपला अहवाल २३ फेब्रुवारी २००५ रोजी सादर केला होता. यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते, तर विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले होते. सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी कॅबिनेट मंत्रीपदावरून राजीनामा दिला होता. अशी अनेक प्रकरणे सावंत यांनी हाताळली. त्यांच्या जाण्याने वकिली आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -बारामतीत एटीएम केंद्रात रक्कम न भरता 3 कोटींचा अपहार, सातजणांविरोधात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details