महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकण साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत पवार यांचं निधन; साहित्य अकादमी पुरस्कारानेही झाला होता गौरव - senior journalist jayant pawar dies

जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले.

jayant pawar
जयंत पवार

By

Published : Aug 29, 2021, 2:32 PM IST

पुणे- ज्येष्ठ पत्रकार, नाटककार आणि लेखक जयंत पवार यांचे निधन झाले. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 61 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे व मुलगी असा परिवार आहे.

संवेदनशील लेखक अशी ओळख -

मराठी भाषेतील एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे अंधातर हे नाटक खुप गाजले होते. समुद्र लेखक म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या नाटकातून त्यांनी नेहमी समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य केले.

साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवान्वित -

जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले. २०१४ मध्ये १० ते १२ जानेवारी दरम्यान, महाड येथे १५वे कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे अध्यक्षपदही जयंत पवार यांनी भूषविले होते. पवार यांना त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. नाटककार, लेखक अशी छाप जयंत पवार यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाडली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी नाटक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा -Dr. Gail Omvedt Passes Away : ज्येष्ठ संशोधक-लेखिका डॉ. गेल ओमवेट निवर्तल्या

ABOUT THE AUTHOR

...view details