महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rohit Pawar on Warishe Death Case : पत्रकार शशिकांत वारीसे हत्या प्रकरणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार : आमदार रोहित पवार - पत्रकार वारीसे हत्या प्रकरण विधानसभेत

कोकणामध्ये नाणार रिफायनरी होऊ नये. हे कोकणासाठी फायद्याचे नाही. या विरोधात लिहिणारे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येचा मुद्दा विधानसभेत मांडू. असे जर कोणी कोणाविरुद्ध लिहीत असेल आणि म्हणून त्याचा जर खून होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

MLA Rohit Pawar On Warise Murder Case
आ. रोहित पवार

By

Published : Feb 11, 2023, 10:39 PM IST

आ. रोहित पवार पत्रकारांना उत्तरे देताना

पुणे:आमदार रोहित पवार आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. आमचे नेते अजित पवार विरोधी पक्ष नेते म्हणून हा प्रश्न मांडतील. अशा प्रकारच्या घटना होत असतील तर या चुकीचे आहेत. त्यावेळी त्याने सोलापूर जिल्ह्यात झालेल्या वादावर सुद्धा प्रतिक्रिया दिली. मी माझी भूमिका मांडली नसून तेथील पक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका मांडली. त्यामुळे मी वैयक्तिक भूमिका मांडलेली नाही. मी जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि प्रणिती शिंदे या मला मोठ्या बहिणी सारख्या आहेत. त्यामुळे हा वाद काय मोठा नाही. सर्व मतभेद विचारून आपला विरोधक हा भाजपा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे मतभेद विसरून एकत्र यायला हवे असे म्हणत त्याने आमदार प्रणिती शिंदे यांना सुद्धा उत्तर दिले आहे.


दोन गटात वाद : सोलापूर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त करून आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण आमदार रोहित पवार असे म्हटले होते. नंतर सोलापूरमध्ये दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला होता. त्यावर आता रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे.


तर अजित पवार मुख्यमंत्री होतील: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार कार्यकर्ते सध्या अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. यावर सुद्धा रोहित पवार म्हणाले आहेत की, अजित पवारांमध्ये ती क्षमता आहे. सर्वच मित्रपक्षाने ठरवले आणि कार्यकर्त्यांनी ठरवले तर अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि ते पूर्ण क्षमतेने काम करतील. त्यांच्यामध्ये ती क्षमता असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सोलापुरात पवार-शिंदे् वाद: सोलापूर लोकसभेच्या जागेवरून सध्या सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी या मागणीसाठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ही मागणी केली आहे. रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर प्रणिती शिंदे यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे.

प्रणिती म्हणाल्या, कोण रोहित पवार?सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी मागत असल्याने काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसच्या शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी तर थेट बारामती लोकसभा मतदार संघ काँग्रेससाठी सोडा अशी मागणी केली होती. काँग्रेसच्या तीन वेळा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची या प्रकरणात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. उत्तर देताना थेट कोण रोहित पवार? असा उलटप्रश्न माध्यमांना केला. रोहित पवार यांची आमदारकीची पहिली टर्म आहे, त्यामुळे त्यांच्यातील पोरकटपणा गेलेला नाही.असे उत्तर देत प्रणिती शिंदेनी रोहित पवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

हेही वाचा:Congress Meeting Mumbai : पटोले-थोरातांमधील वाद मिटणार? काँग्रेसच्या नेत्यांची रविवारी बैठक

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details