पुणे Job Scam :मागील काही महिन्यांपासून पुणे शहरात फसवणुकीच्या घटना अधिक घडत असून विविध ठिकाणी जॉब लावून देतो, असं सांगत मोठी रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे. दरम्यान, अशीच एक घटना आता पुण्यातील वानवडी येथे घडल्याचं समोर आलं आहे.
फसवणूक करणाऱ्याला अटक :वानवडी पोलीस स्टेशनमध्ये धोंडीबा राघू मोटे (वय 21, रा.मोटेवडी, सांगली) यांनी तक्रार दिली असून त्यावरून रणजीत कुमार राजेंद्र सिंग (रा.कोईमत्तूर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार धोंडीबा मोटे हा फेब्रुवारी 2023 पासून रेस कोर्स वानवडी येथे सैन्यदलातील भरतीचा सराव करत असून आरोपी रणजीत कुमार राजेंद्र सिंग तिथे येऊन तो आर्मी इंटेलिजन्सच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करत असल्याचं सांगायचा. तसंच सिकंदराबाद येथे भरती करतो असं सांगून तक्रारदारासह त्याने अजून चौघांकडून वेळोवेळी एकूण 12,80,000/-रुपये रोख स्वरूपात आणि ऑनलाइन स्वरूपात घेऊन फसवणूक केली.
12 ते 15 युवकांची केली फसवणूक :आरोपीने तक्रारदारासह परमेश्वर महादेव घोडके (रा. जेवळी ता.लोहार, जि. उस्मानाबाद) ,दत्ता चंद्रकांत म्हेत्रे (रा.देवणी,ता देवणी, जि. लातुर),अभिजीत सूर्यकांत तांबे (रा.मयूर पार्क हांडेवाडी,पुणे), सचिन वसंत पवार (रा.रहमतपुर ता.कोरेगाव जि.सातारा),आदित्य संजय पवार (रा. संदर),प्रतीक प्रवीण पवार (रा.संदर). तसंच सुरज सुनील मोरे (रा. मोरेवाडी,ता.जावळी,जि. सातारा),चेतन हनुमंता चव्हाण (रा.आरळे),अभय श्रीरंग नलावडे (रा.पानपेळवाडी ता.जि. सातारा),गणेश क्षीरसार (रा. तुळजापूर जि.उस्मानाबाद),निलेश दयाप्पा नाईक (रा. धाटी,ता.चंदगड, जि.कोल्हापूर),प्रमोद दशरथ गावडे (रा.हल्लारवाडी, ता.चंदगड, जि.कोल्हापूर) व तौसीफ शेख ता. तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद यांच्याकडून आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सर्वांची आर्थिक फसवणूक केली. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करताय.
हेही वाचा -
- Thane Crime: पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून 16,180 कोटी रुपयांना चुना; आरोपींचा शोध सुरू
- Two Nigerian National Arrested : 62 लाखांची ऑनलाईन फसवणूक; 2 नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक
- Govt Officials Fake FB Account : शाहरुख खानचा कारनामा; शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक