महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात शाळा बंद! विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र ऑनलाईन सुरू, ज्ञान प्रबोधिनीचा उपक्रम - कोरोना विषाणू बातमी

विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण बुडू नये यासाठी सोशल मीडियाचा वापर करून प्रशालेच्यावतीने शिक्षकांना व विद्यार्थ्यांना एक अ‌ॅप इंस्टॉल करून देण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थी व शिक्षक आपापल्या घरीच या व्हर्चुअल क्लासरुमद्वारे शिक्षण घेत असल्याची, माहिती प्रशालेच्या मुख्यध्यापक मिलिंद नाईक यांनी दिली.

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा उपक्रम
ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा उपक्रम

By

Published : Mar 23, 2020, 10:17 AM IST

Updated : Mar 23, 2020, 4:34 PM IST

पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शाळा महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांचे शिक्षणात खंड पडू नये म्हणून ज्ञान प्रबोधनी प्रशालेतर्फे इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लासरूम सुरू करण्यात आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. जसे लेक्चर प्रशालेत होत असतात तसेच लेक्चर या व्हर्चुअल क्लासरुमद्वारे घेतले जात आहेत. या व्हर्चुअल क्लासरूममध्ये प्रत्येक विषयानुसार शिक्षक आपापल्या घरातून लॅपटॉपद्वारे क्लास घेत आहेत. यामध्ये सर्व विद्यार्थी ऑनलाईन येऊन शिक्षण घेत आहेत.

पुण्यात शाळा बंद! विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र ऑनलाईन सुरू

विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण बुडू नये यासाठी सोशल मीडियाचा वापर करून प्रशालेच्यावतीने शिक्षकांना व विद्यार्थ्यांना एक अ‌ॅप इंस्टॉल करून देण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थी व शिक्षक आपापल्या घरीच या व्हर्चुअल क्लासरुमद्वारे शिक्षण घेत असल्याची, माहिती प्रशालेच्या मुख्यध्यापक मिलिंद नाईक यांनी दिली.

हेही वाचा -अशी ही भूतदया.. एका पुणेकराने भागवली पक्षांची भूक

एकीकडे आज लोक सोशल मीडियाचा वापर फक्त मौजमजेसाठी करत असले तरी अशा परिस्थितीतही सोशल मीडियाचा प्रभावी वापर ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्यावतीने करण्यात येत आहे. सर्व महाविद्यालयांनी अशाप्रकारे व्हर्च्युअल क्लासरूमचा वापर करावे, असे आवाहनही प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा -"कामाव्यतिरिक्त बाहेर न पडता नागरिकांनी सतर्क राहावे"

Last Updated : Mar 23, 2020, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details