महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad : राज्यात जातीवाद पसरवणारा माणूस म्हणजे राज ठाकरे - जितेंद्र आव्हाड - जितेंद्र आव्हाड टीका

राज्यात जातिवाद पसरवणारा माणूस म्हणजे राज ठाकरे असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीवाद पसरवल्याचा आरोप केला होता. त्या टीकेला आव्हाड यांनी प्रत्युत्तर ( Jitendra Awhad critics on Raj Thackeray ) दिले आहे. ते पुण्यात बोलत होते.

Jitendra Awhad critics
जितेंद्र आव्हाड

By

Published : Dec 2, 2022, 11:04 PM IST

पुणे : राज्यात जातीयवादाला सुरुवात झाली आहे. ते जातीवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यामुळे सुरू झाले असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की राज ठाकरे वारंवार पुरंदरेंच नाव घेतात, आणि जयसिंग पवार यांच्या तोंडात काही शब्द त्यांनी घातले. त्यांनी बाहेर येऊन सागितले, मी बोललो नाही. राज्यात जातिवाद पसरवणारा माणूस म्हणजे राज ठाकरे असल्याचे त्यांनी ( Jitendra Awhad critics on Raj Thackeray ) सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात राज ठाकरे यांच्यावर टीका केली

काकड आरत्या बंद झाल्या - शरद पवार यांनी कधीच जातिवाद पसरवला नाही. राज्यात भोंगा कोणी काढला त्यामुळे काकड आरत्या बंद झाल्या, अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली. पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सुनील गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आव्हाड उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.


कायदा सर्वांसाठी समान - आज राज्यपाल पुण्यात असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावर आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यपाल विरोध आंदोलन कोणाचही असो पोलिसांचा कायदा असतो, ते काम करत आहेत. त्यांना काम करावं लागेल. हर हर महादेव बंद पाडला मी एक दिवसासाठी आत होतो, असे यावेळी माजी मंत्री आव्हाड म्हणाले.

लोकांना राजे मानणारे माणूस -छत्रपती उदयनराजे यांच्या बाबतीत आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही लोकांना राजे मानणारे माणूस आहेत. उदयनराजे हे राजे छत्रपतींचे वारसदार आहेत. संविधानाने त्यांना स्वतंत्र दिले आहे. त्यांना पाहिजे ते करू शकतात, असे यावेळी आव्हाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details