पिंपरी चिंचवड Jayant Patil Reaction:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील मेळाव्यात बोलताना अनेक गौप्यस्फोट केला होता. त्यावर शरद पवारांनी देखील उत्तर दिलं आहे. यावर आता जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. यावेळी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे, जेष्ठ नेते आझम पानसरे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी: पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात आता शरद पवार गट घुसखोरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज पिंपरी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यालयाचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जयंत पाटलांनी अजित पवार ( Ajit Pawar) यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले जयंत पाटील: अनिल देशमुखांनी त्यावेळी काय घडलं हे स्वतः सांगितलं आहे. मुश्रीफ कसे येऊन बसले होते, सर्व इतिहास सर्वांच्या समोर आहे. सुज्ञास अधिक सांगायला लागू नये. तसेच अजित पवारांच्या आरोपावर शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्या दोघांमधील संवादामध्ये एकाने भाष्य केल्यानंतर दुसऱ्याने खुलासा केल्यावर तिसऱ्याने भाष्य करणं योग्य नाही. पवार यांनी अतंत्य समर्पक शब्दांत खुलासा केलेला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शक्तिप्रदर्शन :पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे. येथे सुरू असलेले काम पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्वीची दिवस नक्की येतील. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत.
शनिवारी काही पक्षप्रवेश?: अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. शहराध्यक्ष तुषार कामठे त्यांच्याशी संपर्कात आहेत. लवकरच त्यांचे प्रवेश होतील.
राजेश टोपे यांच्या वाहनांची तोडफोड :माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही, माहिती घेऊन मी बोलतो.
अजित पवार शिबीर आरोप : अनिल देशमुखांनी त्यावेळी काय घडलं हे स्वतः सांगितलं आहे. मुश्रीफ कसे येऊन बसले होते, सर्व इतिहास सर्वांच्या समोर आहे. सुज्ञास अधिक सांगायला लागू नये.