पुणे - गणेशोत्सव मंडळांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या जय गणेश व्यासपीठातर्फे लॉकडाऊनच्या काळात कोणीही उपाशी राहू नये याकरीता भोजनसेवा उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यात बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिला व तृतीयपंथीयांना दररोज ३०० तयार भोजनाचे पॅकेट देण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली. तसेच, बाहेरगावातून पुण्यात वास्तव्याला असलेले विद्यार्थी व गरजूंना देखील विनामुल्य भोजनाची सोय करण्यात येणार आहे.
माहिती देताना सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष तृतीयपंथी प्रतिनिधी हेही वाचा -Corona : बारामतीत सापडले १५२ सुपर स्प्रेडर, हॉटस्पॉट गावांमध्ये अँटीजेन तपासण्या
बुधवार पेठेत महिलांना भोजन वितरण करण्याच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शिरीष मोहिते, पीयूष शाह, हनुमंत शिंदे, आदी उपस्थित होते.
बाहेरगावचे विद्यार्थी व गरजूंकरीता भोजनाची विनामुल्य सोय
बुधवार पेठेतील भोजनाची वितरण व्यवस्था महाराष्ट्र तरुण मंडळ, वीर हनुमान मंडळ व गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. तर, बाहेरगावचे विद्यार्थी व गरजूंकरीता शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. माजी सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पुण्यधाम आश्रम व इस्कॉन, पुणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे.
जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून विविध मंडळे एकत्र येत करत आहे सोय
शिरीष मोहिते म्हणाले, पुण्यामध्ये गणेशोत्सव मंडळांची ताकद मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, या भावनेने या उपक्रमाला सुरुवात करीत आहोत. त्यामध्ये बुधवार पेठेतील महिला, विद्यार्थी व गरजूंना भोजनाची सोय करण्यात येणार आहे. सेवा मित्र मंडळाच्या येथे किंवा ८८८८७७९३९३, ९८२३०२३०२१ यावर संपर्क साधल्यास भोजनाची विनामुल्य सोय जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही करून देणार आहोत. तरी गरजूंनी संपर्क साधावा.
हेही वाचा -जीएमसी मृतदेह बेपत्ता प्रकरण; ढोकणे कुटुंबीयांनी उपोषण घेतले मागे