पुणे - भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात झालेल्या भाजप पदाधिकारी बैठकीत मुळीक यांचे नाव जाहीर केले.
बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुणे शहर भापजच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली. या पदाचा वापर करत सर्वसामान्य पुणेकरांना न्याय मिळवून देण्याचे काम करू असे नवनिर्वाचित शहराध्यक्षांनी यावेळी सांगितले.