महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jagannath Rath Yatra Pune : पुण्यात जगन्नाथ रथयात्रेचा सोहळा जल्लोषात साजरा, भरपावसात पुणेकरांनी केली मोठी गर्दी - iskcon temple Katraj

पुण्यात जगन्नाथ रथयात्रेचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी सुमारे 5 ते 6 हजार भाविकांची उपस्थिती होती. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी या यात्रेची सुरुवात केली आहे.

Jagannath Rath Yatra Pune
पुण्यातील जगन्नाथ रथयात्रा

By

Published : Jun 25, 2023, 7:50 PM IST

पहा व्हिडिओ

पुणे : 'हरे रामा, हरे कृष्णा, जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा' असा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह, अशा भक्तीमय वातावरणात पुण्यात जगन्नाथ रथयात्रेचा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.

पुण्यातील जगन्नाथ रथयात्रा

5 ते 6 हजार भाविकांची उपस्थिती : टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून या रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी प. पू. लोकनाथ स्वामी महाराज, प. पू. प्रबोधानंद सरस्वती स्वामी महाराज, प. पू. श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज तसेच सुमारे 5 ते 6 हजार भाविकांची उपस्थिती होती.

पुण्यातील जगन्नाथ रथयात्रा

इस्कॉनच्या संस्थापकांनी केली सुरुवात : ओडिशातील जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो भाविक जमतात. भगवान जगन्नाथाची ही यात्रा भारतभर पोहचवण्यासाठी इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी येथे तिची सुरूवात केली. रथयात्रेच्या दिवशी कात्रज मधील इस्कॉन मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते.

पुण्यातील जगन्नाथ रथयात्रा

70 हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप : रथयात्रेतील रथाची उंची 20 फूट इतकी आहे. रथावर फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी सजावट करण्यात आली. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविकांनी ओढला. संपूर्ण रथयात्रेदरम्यान तब्बल 70 हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप आणि 10 हजार भक्तांना भोजन देण्यात आले. विविध प्रकारचे वाद्यवादन व वेशभूषा केलेले कलाकार देखील रथयात्रेत सहभाग झाले होते.

पुण्यातील जगन्नाथ रथयात्रा

रथयात्रेचा मार्ग : सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून निघालेली ही यात्रा अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे जाऊन सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तिचा समारोप झाला. ठिकठिकाणी या रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यात्रेत अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी झाले होते. सायंकाळी आरती, दर्शन व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील जगन्नाथ रथयात्रा

हेही वाचा :

  1. Ganesh Festival 2023 : पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर अयोध्येतील राम मंदिराची साकारणार प्रतिकृती

ABOUT THE AUTHOR

...view details