मावळ (पुणे)Dashakriya Rituals Of Bull :मावळ तालुक्यातील नाणोली गावात जाधव परिवारात खंड्या नावाचा बैल गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी दाखल झाला. जाधव कुटुंबीयांनी आपल्या मुलाप्रमाणं खंड्याचा सांभाळ करून मोठा केला. (Maval Taluka) गेली अनेक वर्षे त्यानं बैलगाडा शर्यतीत आपला आणि मालकाचा नावलौकीक केला. अनेक पुरस्कार मिळवले; मात्र गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानं शर्यतीत कामी येणारे हे बैल बिनकामी झाले होते. परंतु, तरीही जाधव कुटुंबीयांनी अशा बैलांना सोडून न देता त्यांचं संगोपन सुरू ठेवलं. अनेक वर्षांत शर्यतीत उतरला नसल्यानं खंड्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं होतं. खंड्या या बैलानं बैलगाडा शर्यतीमध्ये नेहमी अव्वल स्थान प्राप्त करून 'घाटाचा राजा' हा मान मिळून दिला आहे आणि सर्वांचीच मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. (Jadhav Family)
अन् मालक ढसाढसा रडायला लागले :अचानक 7 जानेवारी रोजी या खंड्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मालक गोठ्यामध्ये खंड्याला चारा देण्यासाठी आले. तो मृत अवस्थेत पाहून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली अन् मालक ढसाढसा रडायला लागले. त्यानंतर घरातील प्रत्येकानं अगदी कुटुंबामधील सदस्याप्रमाणे खंड्याला भावपूर्ण निरोप दिला आणि घराबाहेरच त्याचा अंत्यविधी करून समाधी बनविण्यात आली. त्याचबरोबर घरातल्या सदस्याप्रमाणं त्याचा आज 17 जानेवारी रोजी नाणोली गावात दशक्रिया विधी पार पडला. यावेळी शोकसभा आणि प्रवचन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
8 महिन्यांचा असताना केला होता खरेदी :खंड्याला भावपूर्ण निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. त्याच्या आठवणीत अनेक जन दशक्रिया विधीला आले आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली. मावळ तालुक्यातील नानोली गावात जाधव या शेतकऱ्यानं त्याच्या लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे. जाधव कुटुंबीयांनी 8 महिन्याचा असताना खंड्या हा बैल अंकुश जाधव यांच्याकडून खरेदी केला होता. त्यानंतर 5 वर्ष त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे.