मुंबई -ज्येष्ठ लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले गिरीश कर्नाड यांचे १० जूनला सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकारांनी तसेच दिग्गज मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ. जब्बार पटेल यांनीही गिरीश कर्नाड यांना आदरांजली वाहिली आहे. मिथकातूनही नाटक जिवंत करणे हे गिरीश कर्नाडचे वैशिष्ट्य होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मिथकातूनही नाटक जिवंत करणे हे गिरीश कर्नाडांचं वैशिष्ट्य - डॉ जब्बार पटेल - jabbar patel
नेक कलाकारांनी तसेच दिग्गज मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ. जब्बार पटेल यांनीही गिरीश कर्नाड यांना आदरांजली वाहिली आहे. मिथकातूनही नाटक जिवंत करणे हे गिरीश कर्नाडचे वैशिष्ट्य होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
'गिरीश कर्नाड, मोहन राकेश, बादल सरकार, तेंडुलकर यांच्यामुळे नॅशनल थिएटर निर्माण झाले होते. यांच्यामुळे रंगभूमी समृद्ध झाली. गिरीशच्या नाटकाचं वैशिष्ट्य हे की तो मिथकातूनही नाटक जिवंत करायचा. तो अत्यंत तार्किक होता. खूप हुशार होता. तो आधुनिक काळाचा प्रवक्ता होता. त्याचा व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रसन्न होतं. त्याचा अभ्यास प्रचंड होता. नाटकात वेगळेपण कसे येईल, दिग्दर्शकाला आणि नटाला ते अवघड कसं होईल हे तो बघायचा', असेही ते यावेळी म्हणाले.
'ऐतिहासिक नाटक किंवा पुराणातील संदर्भासहित नाटक असेल तर तो आधुनिक संदेश देऊन तो नाटक सादर करायचा. विशेष म्हणजे त्याचं नाटक कोणत्याही काळातली असलं तरीही आताच्या काळात त्याचे संदर्भ लागू होतात. तो एक उदारमतवादी नाटककार होता', असेही ते शेवटी म्हणाले.