पुणे Pune Crime News :पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाच्यावतीनं आज (19 ऑक्टोबर) पहाटेपासून छापेमारी सुरू आहे. पत्र्या मारुती चौक हडपसर बाणेर परिसरात आयकर विभागाची ही छापेमारी सुरू आहे. आयकर विभागाच्या ४० वाहनातून आलेले आयकर अधिकारी छापेमारी करत आहेत. हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी देखील आयकर विभागाकडून धाडसत्र सुरू आहे. दरम्यान, आयकर विभागानं आज पहाटेच पुण्यात छापीमारी सुरू केल्यानं अनेक उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.
40 वाहनांमधून अधिकाऱ्यांचा फौजफाटा :आयकर विभागाची ही छापेमारी अतिशय गुप्त पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. पहाटेच्या वेळी जवळपास 40 वाहनांमधून अधिकाऱ्यांचा फौजफाटा येथे दाखल झाला. त्यानंतर निळकंठ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बाणेर आणि पाषाण या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार कागदपत्रासह मालमत्ताची माहिती घेणं सुरू आहे. तसंच मोठ्या पोलीस बंदोबस्तासह ही छापेमारी सुरू असल्यानं सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहे. पूर्वी पुण्यामध्ये मोठे बांधकाम व्यावसायिक कारखानदार आदींवर आयकर विभागाच्या धाडी पडायच्या. परंतु आता या धाडींचं वारं थेट सोने व्यावसायिकांपर्यंत पोहोचलं आहे.