पुणे : इशरत जहाँ प्रकरणावर हे पुस्तक असून याच प्रकाशन आज पुण्यात माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील, कायदेतज्ज्ञ आसिम यांच्या हस्ते होणार आहे. हे पुस्तक फेक एन्काऊंटरचा भंडाफोड करणारे पुस्तक असून 'इशरत जहाँ एन्काऊंटर' या नावाने हे पुस्तक असल्याचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी म्हटले आहे. 2006 सिरीयल बॉम्बस्फोटाच्या खोट्या केसमध्ये नऊ वर्षे तुरुंगात राहून कोर्टातून निर्दोष सिद्ध झालेले मुंबई येथील पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
वादग्रस्त कार्यक्रमामुळे हॉल रद्द :'या पुस्तकात मी खरी परिस्थिती वापरली आहे. इशरत जहाँ हिला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे. हा पूर्णपणे फेक एन्काऊंटर असल्याने मी हे पुस्तक लिहिले आहे. आता हे पुस्तक उर्दू भाषेत असून लवकरच मराठी आणि हिंदीमध्ये देखील हे पुस्तक येणार आहे', असे यावेळी लेखक वाहिद शेख यांनी म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ, पुणे येथे होणार आहे. व्यवस्थापकाने भाडे स्वीकारले व तशी हॉल आरक्षित केल्याची भाडे पावती दिली. या प्रकाशन सोहळा बाबत उपस्थित राहणारे माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, सेवानिवृत्त आयजी एस.एम. मुश्रीफ आणि अन्य वक्त्यांची माहिती खडक पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांना समक्ष भेटून देण्यात आली. तसा अर्जही त्यांनी स्वीकारला. पण, अचानक रविवारी सकाळी हॉलची देखरेख करणारे महापालिका कर्मचारी कोडीतकर यांनी तुमचे पुस्तक सेन्सिटिव्ह आहे. पुस्तक प्रकाशनासाठी तुम्हाला दिलेला हॉल तो आम्ही रद्द करीत आहोत. कृपया आपण आपले पैसे घेऊन जावे, असे सांगितले असे यावेळी मूल निवासी मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले.