शिरूर (पुणे) -कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ येथे एक जानेवारीला शौर्यदिन साजरा केला जातो. या शौर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी देशभरातील असंख्य नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे शौर्यदिनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा व्हावा, यासाठी विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आमंत्रित केले आहे.
कोरेगाव-भीमा : शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाच्या अभिवादनासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण हेही वाचा -सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; मनसेची मागणी
कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाच्या शौर्यदिनाला 200 वर्षाचा काळ उलटला असून यंदा 203 वर्षे पूर्ण होत आहेत. शौर्यदिनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून मानवंदना द्यावी. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजय स्तंभावरील शौर्यदिन मर्यादित लोकांच्या उपस्थितीत धार्मिक व परंपरा जपून साजरा केला जाणार आहे. या काळात विजयस्तंभ परिसरात गर्दी होणार नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव-भीमाला येऊन विजयस्तंभाला मानवंदना दिल्यास शौर्य दिनाच्या इतिहासात एक वेगळा आदर्श निर्माण होईल, असा आशावाद विजयस्तंभ सेवा समितीने व्यक्त केला आहे. यासाठी समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे.
हेही वाचा -दिल्लीला अ.भा.म.साहित्य संमेलन घ्यावे, सरहद संस्थेचा पुढाकार