महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयात अद्यावत अतिदक्षता विभागाची स्थापना, क्रेडाई, पुणे मेट्रोचा पुढाकार

केवळ आठ दिवसांच्या विक्रमी कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयात क्रेडाई, पुणे मेट्रोने अद्ययावत अतिदक्षता विभाग (ICU) उभा केला. या अतिदक्षता विभागाच्या उभारणीसाठी एक कोटी रुपये निधीची आवश्यकता होती. हा सर्व निधी क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे उपलब्ध करून देण्यात आला. पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या उपस्थितीत या अतिदक्षता विभागाचे हस्तांतरण करण्यात आले.

Dalvi Hospital
दळवी रुग्णालय

By

Published : Apr 28, 2020, 11:40 AM IST

पुणे - कोरोना विरुद्धच्या लढ्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई, पुणे मेट्रोने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ आठ दिवसांच्या विक्रमी कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयात क्रेडाई, पुणे मेट्रोने अद्ययावत अतिदक्षता विभाग (ICU) उभा केला.

क्रेडाई पुणे मेट्रोच्यावतीने महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयात अद्यावत अतिदक्षता विभागाची स्थापना

या अतिदक्षता विभागाच्या उभारणीसाठी एक कोटी रुपये निधीची आवश्यकता होती. हा सर्व निधी क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे उपलब्ध करून देण्यात आला. पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या उपस्थितीत या अतिदक्षता विभागाचे हस्तांतरण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे, क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी तेजराज पाटील आणि आय. पी. इनामदार आदी यावेळी उपस्थित होते.

या अतिदक्षता विभागात बेड, व्हेंटिलेटर, डिफिलेटर, सक्शन मशीन, ईसीजी मशीन यासारख्या ४० अद्ययावत उपकरणांचा समावेश आहे. त्यामुळे कोविड-१९ शी लढणाऱ्या रुग्णांना यामुळे अद्ययावत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्तांनी क्रेडाई पुणे मेट्रोला कोव्हिड-१९ च्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासंदर्भात दळवी रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारावा या संदर्भात आवाहन केले. तेव्हा पुढील १५ दिवसात महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये अद्ययावत अतिदक्षता कक्ष उभारू असे आश्वासन क्रेडाई दिले. मात्र, क्रेडाईच्या पदाधिकाऱयांनी यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत विक्रमी आठ दिवसांच्या कमी कालावधीत रुग्णांच्या सेवेसाठी हे आयसीयु युनिट तयार केले. संकटाच्या या काळात बांधकाम व्यावसायिक महापालिकेच्या सोबत आहोत, असा विश्वास क्रेडाईचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिला.

शिवाजीनगर भागात दळवी रुग्णालय हे महिलांच्या प्रसूतीसाठीचे एकमेव रुग्णालय आहे. या ठिकाणी अद्ययावत अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने या भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. विक्रमी वेळेत तयार झालेला हा अतिदक्षता विभाग महानगरपालिकेच्या इतिहासात नोंद करण्यासारखा टप्पा आहे. गरीब रुग्णांसाठी आता खऱया अर्थाने हे रुग्णालय आश्रयस्थान राहील याचा आनंद आहे. यासाठी महानगरपालिकेच्या मी क्रेडाई पुणे मेट्रोचे आभार मानतो, असे आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.

क्रेडाई पुणे मेट्रोने संकटाच्या काळात सामाजिक दायित्व दाखवत मदतीचा हात पुढे केला आहे. ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे, अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details