महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वन्यप्राण्यांसाठी कुलिंग व्यवस्था

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्यप्राण्यांचा उन्हाच्या तडाख्यापासून बचाव व्हावा, यासाठी कुलिंग व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

वन्यप्राण्यांसाठी कुलिंग व्यवस्था

By

Published : Apr 28, 2019, 9:58 PM IST

पुणे - शहरात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे याचा फटका नागरिकांसोबतच प्राण्यांनाही बसत आहे. पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांचा उन्हाच्या तडाख्यापासून बचाव व्हावा, यासाठी कुलिंग व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या पिंजऱ्यात, गुहेत वॉटरगनद्वारे पाण्याचा शिडकावा करणे, कुलर बसवणे, चिखलाच्या खड्यांची व्यवस्था करणे, खंदकात पाण्याचा साठा करणे, अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय पिंजऱ्यात राहणाऱ्या प्राण्यांसाठी फॉगर बसवण्यात आले आहेत. तर हत्तींना थंड पाण्याने अंघोळ घालण्यात येत आहे.

वन्यप्राण्यांसाठी कुलिंग व्यवस्था

संग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही उन्हाच्या झळा सोसाव्या लागू नये याचीही काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. उद्यानातील हिरवाई जपण्यासाठीही विशेष काळजी घेतली जात आहे. या प्राणी संग्रहालयात सध्या वाघ, बिबट्या, सिंह, हत्ती, अस्वल यासह सापासारखे सरपटणारे प्राणी, तसेच हरिण, सांबार यांसारखे तृणभक्षी प्राण्यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. दुपारी बारानंतर घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. तहान लागली तर माणूस सावली शोधतो, थंड पाणी मागून घेतो. पण या मुक्या प्राण्यांचे काय? राजीव गांधी प्राणी संग्रहालय प्रशासन मात्र, या प्राण्यांची काळजी चांगल्याप्रकारे घेताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details