चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये पंचायत समिती अधिकाऱ्यांकडून पाहणी - pune covid 19 update
चाकण औद्योगिक वसाहतीत पन्नास टक्के कामगारांवर कंपनी सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार कंपनी प्रशासन काम करतात की नाही याची पाहणी पंचायत समितीच्या अधिकारी व सभापती यांनी केली.
चाकण (पुणे) -चाकण औद्योगिक वसाहतीत कोरोना संसर्ग वाढत असताना चाकण परिसरातील कंपन्यांमध्ये फिजीकल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझिंग करणे अशा विविध अटींवर काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तरीही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गट विकास आधिकारी अजय जोशी, आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे, सभापती अंकुश राक्षे यांनी चाकण परिसरातील कंपन्यांची पहाणी केली.
चाकण औद्योगिक वसाहतीत पन्नास टक्के कामगारांवर कंपनी सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार कंपनी प्रशासन काम करतात की नाही याची पहाणी पंचायत समितीच्या आधिकारी व सभापती यांनी केली. पुढील काळात कंपनीमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी तालुका आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे यांनी मार्गदर्शन केले.
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये छोटे मोठे २५० पेक्षा जास्त उद्योग सुरू आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातून कामगार कंपनीमध्ये जातात. सध्या खेड, आंबेगाव, व चाकण परिसरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी लवकरात लवकर तोडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.