पुणे - पिंपरीमध्ये दुसऱ्यांच्या भांडणात एका 23 वर्षीय तरुणाचा हकनाक बळी गेल्याचे पिंपरी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शनिवारी गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. वर्चस्वातून झालेल्या भांडणात तरुणाचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना वाटले होते. मात्र, तपासात आरोपी हे दुसऱ्याच एका तरुणाला मारायला आले होते, परंतु, झोपलेल्या शंकर गोविंद सुतार याच्यावर कोयत्याने वार आणि दगडी पाटा डोक्यात घालून खून केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार विनोद उर्फ पप्या राकेश पवार वय- 21, अजय उर्फ एबी गणेश भिसे वय- 20 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालू पात्रे नावाचा आरोपी हा जेलमध्ये आहे. त्याचा चुलत भाऊ अर्जुन पात्रेने त्याचा फोटो व्हाट्सऍप स्टेट्स ठेवला होता. दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपीपैकी मुख्य आरोपी पप्प्या पवार याच्याकडे अर्जुन पात्रे हा रागाने पाहायचा, असे त्याने पोलिसांना सांगितले. शनिवारी मध्यरात्री पप्प्या पवार, अजय भिसे यांच्यासह इतर सहा अल्पवयीन मूल हे अर्जुन पात्रे राहात असलेल्या ठिकाणी गेले. मात्र, तो तिथे नव्हता.
भांडण दुसऱ्याचे बळी तिसऱ्याचा; पिंपरीतील खुनाचा झाला उलगडा
या घटनेप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली असून 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान, मृत शंकर सुतार हा त्याच्या घरासमोर पेंडोलमध्ये झोपला होता. पैकी, एका आरोपीने त्याला बाहेर ओढत अर्जुन पात्रे विषयी विचारले, परंतू तो काही बोलण्याच्या आत इतर आरोपींनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करत दगडी पाट्याने शंकरचा खून केला. या घटनेमध्ये शंकरचा काहीच सहभाग नव्हता. मात्र, त्याचा हकनाक बळी गेल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले. या घटनेप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली असून 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या पथकाने केली आहे.