महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sawai Program: सवाई दरम्यान होणाऱ्या षड्ज, अंतरंग आणि छायाचित्रप्रदर्शनाची माहिती जाहीर

१४ ते १८ डिसेंबर दरम्यान पुणे येथे होणाऱ्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे (Sawai Gandharva Bhimsen Festival)आयोजन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी होणार (Sawai Program) असून याच दरम्यान शिवाजीनगर येथील (shadja antarga and photo exhibition) राहुल थिएटर शेजारी असणाऱ्या सवाई गंधर्व स्मारक या ठिकाणी दि. १४, १५ व १६ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते १ या वेळेत षड्ज व अंतरंग हे कार्यक्रम पार (Srinivas Joshi PC) पडतील. Latest news from Pune

Sawai Program
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पीसी

By

Published : Dec 9, 2022, 3:37 PM IST

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवादरम्यान (Sawai Gandharva Bhimsen Festival) होणाऱ्या षड्ज, अंतरंग आणि ‘शताब्दी स्मरण’ या चित्रप्रदर्शनाची (shadja antarga and photo exhibition) माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी (Srinivas Joshi PC) यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. त्यानंतर सतीश पाकणीकर यांनी यंदाच्या छायाचित्र प्रदर्शनाची (Sawai Program) माहिती पत्रकारांना दिली. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, डॉ. प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. Latest news from Pune

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पीसी

वैशिष्टपूर्ण चित्रप्रदर्शन :१४ ते १८ डिसेंबर दरम्यान ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी होणार असून याच दरम्यान शिवाजीनगर येथील राहुल थिएटर शेजारी असणाऱ्या सवाई गंधर्व स्मारक या ठिकाणी दि. १४, १५ व १६ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते १ या वेळेत षड्ज व अंतरंग हे कार्यक्रम पार पडतील. शिवाय महोत्सवादरम्यान दरवर्षी आयोजित करण्यात येणारे ‘शताब्दी स्मरण’ हे चित्रप्रदर्शन देखील या वेळी वैशिष्ट्यपूर्ण असेल, अशी माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.


षड्ज, अंतरंग या विषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे :
दिवस पहिला - १४ डिसेंबर, २०२२
संगीतमार्तंड पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज आणि त्यांचे भाचे व शिष्य पं. रतन मोहन शर्मा हे पं. जसराजांच्या आठवणींना उजाळा देतील.

दिवस दुसरा –१५ डिसेंबर, २०२२
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक जीवनावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन दुस-या दिवशी करण्यात येईल. या चित्रपटाची निर्मिती आर्य संगीत प्रसारक मंडळाने केली आहे.

दिवस तिसरा – १६ डिसेंबर, २०२२
महान सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांचे सुपुत्र आलम खाँ यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होईल. आलम खाँ हे मेहर सेनी घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक असून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. महोत्सवात असणा-या चित्र प्रदर्शनाविषयी माहिती देताना प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर म्हणाले, “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने संपन्न होणाऱ्या या वर्षीच्या महोत्सवात दर वर्षीप्रमाणे प्रकाशचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी हे प्रदर्शन पं. भीमसेन जोशी यांच्या प्रकाशचित्रांवर आधारित असेल. प्रकाशचित्रात टिपला गेलेला प्रत्येक क्षण आपल्याला पुन्हा तो क्षण जगण्याचा आनंद देतो. प्रकाशचित्राचे हे सामर्थ्य या प्रदर्शनातून पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.”

दिवंगत ज्येष्ठ प्रकाशचित्रकार अनिल देशपांडे व सुधाकर जोशी तसेच सतीश पाकणीकर यांच्या संग्रहातील अनेक प्रकाशचित्रातून आपल्याला यावर्षी देखील काळाच्या पडद्याआड गेलेली मैफल परत एकदा अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे मुख्य आयोजक पं. भीमसेनजी व आपली कला सादर करायला येणारे भारतभरातील कलाकार यांच्यातील स्नेहाचे, एकमेकांच्या कलांना दाद देतानाचे, सत्काराचे, आदराचे, प्रेमाचे संबंध किती अकृत्रिम आणि अत्यंत साधेपणाचे होते हे या प्रदर्शनात पाहता येईल. पं. भीमसेनजी व अन्य कलाकार यांच्या प्रकाशचित्रांबरोबरच पाकणीकरांच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या ‘भीमसेनी मुद्रा’ ही या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असेल. गेली तेरा वर्षे वेगवेगळ्या थीमवर पाकणीकर यांनी महोत्सवात प्रदर्शने सादर केली आहेत, प्रदर्शनाचे हे चौदावे वर्ष आहे अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

तिकीटविक्री ग्राहकपेठ येथे :यावर्षी महोत्सवाची तिकीटविक्री ही टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ येथेही होणार असून रसिकांना या ठिकाणी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकिटे उपलब्ध होऊ शकतील, याची कृपया नोंद घ्यावी.
महोत्सवानंतर घरी जाण्यासाठी ज्या बसमार्गांवर पीएमपीएमएलची सेवा उपलब्ध असतील ते मार्ग खालीलप्रमाणे :
1) मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर भक्ती शक्ती चौक, निगडी
2) मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर सिंहगड रस्ता (मारुती मंदिर, धायरी)
3) मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर कोथरूड डेपो (पौड रस्ता)
4) मुकुंदनगर ते पुन्हा कार्यक्रमानंतर वारजे माळवाडी

कार्यक्रमाला पोहोचू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष सोय :याबरोबरच ओला आणि उबर या वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या एपवर ‘सवाई २०२२’ असे डेस्टिनेश टाकल्यास पुण्यात कोणत्याही ठिकाणाहून महोत्सवाला येण्याचा मार्ग दिसू शकणार आहे. यामुळे प्रवाशांसाठी महोत्सवाच्या ठिकाणी पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. शिवाय रिक्षा संघटनांशी देखील आमचे बोलणे झाले असून त्यांनी महोत्सवासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details