पुणे - येत्या ४८ तासात राज्याच्या विविध भागात सर्वसाधारण ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
मुंबई, कोकणासह राज्यभरात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता - मुसळधार पाऊस
येत्या ४८ तासात राज्याच्या विविध भागात सर्वसाधारण ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याप्रमाणेच कोकण आणि गोव्यामध्येही येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्याप्रमाणेच भाताचे उत्पादन करणाऱ्या तालुक्यांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला आहे. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.