महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; चांगले दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ - कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

रब्बी हंगामातील लागवड झालेल्या कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा पिक धोक्यात आले आहे. अगोदरच किरकोळ बाजारात कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्यातच आता कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

pune
कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; चांगले दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

By

Published : Dec 7, 2019, 8:34 PM IST

Updated : Dec 7, 2019, 9:29 PM IST

पुणे - गेल्या काही दिवसात किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढल्याने कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर शंभरी पार झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट ढासळले आहे. आधीच कांद्याचे कमी उत्पादन आणि आता बदलत्या वातावरणामुळे कांद्याला करपा रोगाची लागण झाल्याने कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; कांद्याला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

हेही वाचा -शहापूर-किन्हवली मार्गावर रिक्षा-जीपचा भीषण अपघात ; १ ठार तर ६ जखमी

रब्बी हंगामातील लागवड झालेल्या कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा पीक धोक्यात आले आहे. अगोदरच किरकोळ बाजारात कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्यातच आता कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याचे उत्पादन घटन्याची शक्यता आहे.

हेही वाचा -सफदरजंग रुग्णालयासमोर 'या' कारणामुळे महिलेकडून आपल्या ६ वर्षांच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न

सध्या सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारभाव गगनाला भिडले आहेत. असे असले तरी सर्वसामान्य शेतकऱ्याला कांद्याच्या वाढलेल्या दराचा फायदा होत नसून व्यापारी वर्गालाच याचा फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. शेतकऱ्यांनी पाच ते सहा रुपये किलोने विकलेला कांदाच आता दिडशे ते दोनशे रुपये किलोने विकत घेण्याची वेळ शेतकरी आणि सामान्यांवर आली आहे.

सध्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सरासरी कांदा लागवड क्षेत्र

खेड - 6 हजार हेक्टर सरासरी
आंबेगाव - 8 हजार हेक्टर सरासरी
जुन्नर - 9 हजार हेक्टर सरासरी
शिरुर - 8 हजार हेक्टर सरासरी

तर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेले बाधीत क्षेत्र

खेड - 4 हजार 800 हेक्टर सरासरी
आंबेगाव - 7 हजार हेक्टर सरासरी
जुन्नर - 7 हजार 500 हेक्टर सरासरी
शिरुर - 7 हजार हेक्टर सरासरी

दरम्यान, शेतात नवीन लावलेला कांदाही परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. तर आत्ताच्या सततच्या ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पातीवर करपा आणि गाभ्यामध्ये मव्या सारखा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने या वर्षी कांद्याचे उत्पादन घटण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. पर्यायाने येत्या काळात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यास सध्याचे कांदाचे बाजारभाव कायम रहातील, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Dec 7, 2019, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details