बारामती (पुणे)- इंदापूर एमआयडीसी येथील जिंदाल कंपनीच्या मालकाने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरले होेते. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार घडला आहे. तसेच राजे समर्थकांनी जिंदाल यांना इंदापूर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना सदर उद्योजकाने अपशब्द वापरल्या प्रकरणी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच पोलीस ठाण्यात जिंदाल यांना हजर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे सिलेंडर लपवून ठेवणारे उद्योजक अशी त्यांची ओळख सांगत त्यांच्यावर आरोप केले. याचबरोबर या उद्योजकाने उदयनराजेंबद्दल बेताल वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उदयनराजे समर्थकांनी पोलिसांकडे तक्रारीतून केली आहे.
छत्रपती उदयनराजेंबद्दल अपशब्द; इंदापुरात उद्योजकाला चोप देऊन फासले काळे - खासदार उदयनराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना सदर उद्योजकाने अपशब्द वापरल्या प्रकरणी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच पोलीस ठाण्यात जिंदाल यांना हजर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे सिलेंडर लपवून ठेवणारे उद्योजक अशी त्यांची ओळख सांगत त्यांच्यावर आरोप केले.
उदयनराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी इंदापुरातील काही समर्थकांनी रस्त्यातच जिंदाल यांचे वाहन अडवून त्यांना रस्त्यावर उतरवले. त्यावेळी संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिल्याचे दृश्य व्हिडिओत दिसून येत आहे. त्यानंतर त्या उद्योजकाच्या तोंडाला काळे फासण्यात आले आणि तेथून उदयनाराजेंच्या समर्थकांनी त्यांना पोलीस ठाण्यात हजर केले. दरम्यान, यावेळी नियमबाह्यपणे मारहाण आणि काळे लावण्याची कृती केल्याने आणि कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असल्यचीही माहिती पोलिसांनी दिली.