महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 30, 2022, 2:34 PM IST

ETV Bharat / state

Uday Samant : 'दोन वर्षात 40 ते 50 हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार' - उद्योग मंत्री उदय सामंत

आदित्य ठाकरे यांनी वेदांताचा एमओयू सप्टेंबरमध्ये झाला असल्याचे म्हणाल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलेले ( Industrial Minister Uday Samant ) आहे. आदित्य ठाकरे खोटी कागदपत्रे दाखवत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले ( Uday Samant Criticize Aditya Thackeray ) आहे.

Uday Samant
उदय सामंत

पुणे :उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांताचा एमओयू सप्टेंबरमध्ये झाला असल्याचे म्हणाल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलेले ( Industrial Minister Uday Samant ) आहे. त्या पत्रावर वेदांताचे अग्रवाल किंवा महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही अधिकारी आणि मंत्र्याची सही नाही. फक्त एमओयू करावा यासाठीच ते पत्र होते. त्यामुळे आदित्य ठाकरे खोटे कागदपत्र दाखवत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले ( Uday Samant Criticize Aditya Thackeray ) आहे.

उदय सामंत

आदित्य ठाकरे खोटे बोलतात : उदय सामंत म्हणाले की मी प्रामाणिकपणे आणि ठामपणाने सांगतो वेदांताचा एमयू झाला ( Vedanta MOU signed in September ) नव्हता. तो करावा त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हाय पावरची कमिटीची बैठक 15 जुलैला झाली. मागील आठ महिन्यात बैठक झाली का ते जे आज पत्रकार परिषद घेऊन सांगत आहेत. त्यांनी तो दाखला द्यावा असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे हे खोटे बोलत आहेत असे सुचित केले आहे. त्यानंतर जो एमओयू झाला. त्यावर अनिल अग्रवाल आणि शासनाची सही आहे का हे दाखला द्यावा अशा पद्धतीचे पत्र देऊन शासनाने अनिल अग्रवाल यांना विनंती केली होती. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कंपनीला 300 हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे. 3000 कोटीचा करार केला हा करार तीन वर्षांपूर्वी झाला होता जी अडचण तीन वर्षांपूर्वी होती. ती एक सुटली सरकारचे कौतूक केले हे त्या पत्रकार परिषदेला उत्तर आहे असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलेले आहे.

उदय सामंत

उत्तर द्यायची गरज :एका उद्योजक कंपनीचे एमडी सुरेश यांनी या सर्वावर उत्तर दिले आहे. त्यामुळे कुणालाही मुख्यमंत्र्यांना किंवा मलाही समोरासमोर जाऊन उत्तर द्यायची गरज नाही. त्या उद्योग समूहाला दोन वर्षांमध्ये जसा प्रतिसाद हवा तसा मिळाला नाही. विनायक राऊत यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्राबाबतीत मी त्यांच्यासोबत असताना काय मीटिंग झाली. कृपा करून मला बोलायला लावू नये. मी त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. त्या ठिकाणी काम करत असले तरी मी त्यांच्याबाबत टीका करत नाही. कारण मी संस्कार मानतो असे म्हणत त्याने विनायक राऊत यांना एक प्रकारे इशारा दिला आहे.

विनायक राऊतांवर टीका :नाणारच्याबाबतीत काही नेते उद्धव ठाकरेंना रिफायनरी विरोधात असल्यासारखे दाखवत आहेत. त्यांनी कुणाकुणाबरोबर किती पैसे घेतले हे मला सगळे माहिती आहे. त्यामुळे जास्त बोलायचे नाही मला. सर्व कोकण ओळखते मी कुणाच्याही जीवावर राजकारण करत नाही. मी माझ्या स्वतःचा विषय करून राजकारण करतो बाकीच्यांनी सुद्धा काय आहे ते जाहीर करावं. माझ्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही असेही उदय सामंत विनायक राऊत यांना म्हणाले आहेत.

मत शासनाकडे व्यक्त केले :पुण्यामध्ये आज मी जर्मन उद्योगाच्या शिष्टमंडळात घटना बैठकीला आलो होतो. चांगल्या वातावरणात बैठक पार पडली. जर्मन शिष्टमंडळाने मागील दोन वर्षात रखडलेले प्रकल्प त्यासंदर्भात सहकार्य करू अशी भूमिका घेतली. आमच्या अडचणीची दखल घेण्यासाठी उद्योगमंत्री आले, आनंद झाला. मागच्या दोन वर्षाच्या संवाद तुटला होता. तो पुन्हा सुरू झाला. दोन अडीच वर्षानंतर आमचे मत शासनाकडे व्यक्त करता आले. याचा आनंद आहे. राज्य सरकारकडून सहकार्य उपलब्ध करु असे उदय सामंत म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details