महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर इंदोरीकर महाराजांना होऊ शकतो तीन वर्षाचा तुरुंगवास

'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य त्यांनी ओझर येथील कीर्तनात केले. त्यांच्या या वक्तव्यावर कायदेतज्ञ आणि अंधाश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.

इंदोरीकर महाराजांना होऊ शकतो तीन वर्षाचा तुरुंगवास
इंदोरीकर महाराजांना होऊ शकतो तीन वर्षाचा तुरुंगवास

By

Published : Feb 11, 2020, 11:34 PM IST

पुणे -सतत चर्चेत असणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर आपल्या एका वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. त्यांनी एका कीर्तनात गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर कायदेतज्ज्ञ आणि अंधाश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.

कायदेतज्ञ आणि अंधाश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला

'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य त्यांनी ओझर येथील कीर्तनात केले. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. पीसीपीएनडिटी या कायद्यानुसार त्यांनी कलम 22 चे उल्लंघन केल्याचा आरोप कायदेतज्ज्ञ रमा सरोदे यांनी केला आहे. या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई झाली आणि गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा -https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/ahmednagar/notice-to-indurikar-maharaj-under-pcpndt-act/mh20200211193308643

इंदोरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य हे समाजात अंधश्रद्धा पसरवणारे कायद्यानुसार त्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मिलिंद देशमुख यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details