महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशाची पहिली स्वदेशी 9 एमएम “अस्मि” पिस्तूल विकसित - asmi pistool machine

डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित 9 एमएम मशीन पिस्तूल विकसित केली आहे. पिस्तूलाचे नाव “अस्मि” असे ठेवण्यात आले आहे.

देशाची पहिली स्वदेशी 9 एमएम मशीन पिस्तूल विकसित
देशाची पहिली स्वदेशी 9 एमएम मशीन पिस्तूल विकसित

By

Published : Jan 15, 2021, 7:50 AM IST

Updated : Jan 15, 2021, 2:13 PM IST

पुणे -डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित 9 एमएम मशीन पिस्तूल विकसित केली आहे. इन्फंट्री स्कूल, महू आणि डीआरडीओच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था(एआरडीई), पुणे यांनी हे पिस्तूल विकसित केले आहे. चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे शस्त्र विकसित केले गेले आहे.

कसे आहे मशीन पिस्तूल?

मशीन पिस्तूल 9 एमएम गोळीबार करते. मेटल थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने बनविलेल्या ट्रिगर घटकांसह विविध भागांच्या डिझाइनिंग आणि नमुन्यामध्ये थ्रीडी प्रिंटिंग प्रक्रिया वापरली आहे. सशस्त्र दलातील कमांडर्स, रणगाडे आणि विमानात तैनात असलेल्या क्रू मेंबर्ससाठी वैयक्तिक शस्त्रे म्हणून या पिस्तूलचा चांगला उपयोग होईल. केंद्रीय आणि राज्य पोलिस संघटना तसेच व्हीआयपी संरक्षण आणि गस्त यामध्ये या पिस्तुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मशीन पिस्तूलाची उत्पादन किंमत प्रत्येकी 50,000 रुपयांपेक्षा कमी असून याची निर्यात होण्याची देखील शक्यता आहे.

अस्मि पिस्तूल
पिस्तूलाचे नाव “अस्मि” असे ठेवण्यात आले आहे. अस्मि म्हणजे “गर्व”, “स्वाभिमान” आणि “कठोर परिश्रम”. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरून स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले हे एक छोटे पाऊल आहे. तसेच सेवा आणि निमलष्करी दल (पीएमएफ) यामध्ये लवकरच याचा समावेश होईल अशी अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -राळेगणसिद्धीत आचारसंहितेची एैशीतैशी; साडी वाटप केल्याने चार जणांवर गुन्हा

Last Updated : Jan 15, 2021, 2:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details