पुणे - गुप्तचर संस्थांच्या मदतीशिवाय शत्रूंना रोखणे शक्य नाही. गुप्तचर विभाग म्हणजे जेम्स बॉण्ड नाही. आपल्या डोळ्यासमोर असे ग्लॅमरस दृश्य येत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे काही नसते. गुप्तचर यंत्रणांच्या मागे काम करणारे लोक ही अदृश्य असतात, असे होणारे नवे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -मराठी पाऊल पडते पुढे.. मराठमोळे लेफ्टनंट मुकुंद नरवणे यांची लष्करप्रमुखपदी वर्णी
'गुप्तचर यंत्रणांच्या मागील काम करणारी लोक आणि गुप्तचर विभाग हे एकत्रितपणे काम करतात. त्यामुळे लष्कराची कोणतीही मोहीम ही गुप्तचर यंत्रणाच्या मदतीशिवाय पार पडत नाही,' असे उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे म्हणाले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित आणि नितीन गोखले यांनी लिहिलेल्या 'आर.एन. काओ-जेंटलमन स्पायमास्टर' या पुस्तकाचे प्रकाशन नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आर. एस. अँड ए. डब्ल्यूचे माजी सेक्रेटरी वापल्ल बालचंद्रन, माजी आयपीएस अधिकारी जयंत उमरानीकर, लेखक नितीन गोखले यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागे फक्त मतेच दिसतात - बच्चु कडू