पुणे- भारत सरकार पर्यायी इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी सकारात्मक धोरण राबवत आहे. त्यामुळे भविष्यात भारत इंधनाची आयात कमी करून मध्य पूर्व आशियातील देशांना इलेक्ट्रिक वाहने निर्यात करेल, असे मत इंडिया अरब कंट्रीज चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अनिरबान सरकार यांनी व्यक्त केले आहे.
भारत भविष्यामध्ये मध्यपूर्व आशियातील देशांना इलेक्ट्रिक वाहने निर्यात करेल- अनिरबान सरकार - Gulf country
गेल्या काही वर्षांमध्ये तेल युद्धामुळे आखाती देश बेचिराख झाले आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनाची गरज आहे. यामध्ये अमेरिका, युरोप आणि रशियन कंपन्या सक्रिय आहेत. या देशांखेरिज तेथे भारतीय उद्योजकांना देखील अनेक संधी उपलब्ध आहे, असे अनिरबान सरकार म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भारत आणि आखाती देशांमधील व्यवसायिकांची सामाजिक संबंध या विषयावर अनिरबान सरकार यांच्या बरोबर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अनिरबान सरकार म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये तेल युद्धामुळे आखाती देश बेचिराख झाले आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनाची गरज आहे. यामध्ये अमेरिका, युरोप आणि रशियन कंपन्या सक्रिय आहेत. या देशांखेरिज तेथे भारतीय उद्योजकांना देखील अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी इंडिया - अरब चेंबर्सच्या वतीने भारतीय उद्योगांना अखाती देशात स्थापन करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. भारतातील कृषी, आरोग्य, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रात कार्यरत संस्थांनी त्यांच्या उद्योगाचा विस्तार अरब देशांमध्ये करावा, असे आवाहन अनिरबान सरकार यांनी केला आहे.