महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत-श्रीलंका लष्कराचा दहशतवादविरोधात पुण्यात संयुक्त लष्करी सराव

दहशतवादाचा धोका भारत आणि श्रीलंका देशाने सतत अनुभवलेला आहे. याविरोधात कसे लढायचे यासाठी 'मित्र शक्ती' या नावाने या दोन देशात मागील काही वर्षांपासून हा सराव केला जातो. यात दोन्ही देशाचे सैनिक संयुक्तपणे दहशतवादाविरोधातील ऑपरेशन राबवतात. याचा थरार पुण्यातील औंधमधील लष्करी कॅम्पमध्ये अनुभवायला मिळाला.

Army exercise
भारत - श्रीलंका लष्करी सराव

By

Published : Dec 6, 2019, 7:01 PM IST

Updated : Dec 6, 2019, 11:15 PM IST

पुणे - सीमेवर अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्यासाठी लष्कराचा जसा थरार सुरू असतो, तसाच थरार पुण्याच्या औंधमधील लष्करी कॅम्पमध्ये अनुभवायला मिळाला. निमित्त होते भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या लष्कराच्या संयुक्त युद्ध सरावाचे. 'मित्र शक्ती' या नावाने या दोन देशात मागील काही वर्षांपासून हा सराव केला जातो. यात दोन्ही देशाचे सैनिक संयुक्तपणे दहशतवाद विरोधातील ऑपरेशन राबवतात.

भारत - श्रीलंका लष्करी सराव

एखादी कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील सैनिकांमध्ये समन्वय असणे ही महत्वपूर्ण बाब असते. दहशतवाद ही जगाला भेडसावणारी समस्या असून त्याविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्रित येत त्याचा बिमोड करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून भारत आणि श्रीलंका या दोन देशातील एकूण 240 जवान मित्र शक्ती या युद्ध सरावात सहभागी झाले आहेत.

भारत - श्रीलंका लष्करी सराव

दोन आठवडे चालणाऱ्या या युद्ध सरावात घनदाट जंगलात लपलेल्या अतिरेक्यांचा बिमोड करणे, संशयास्पद वस्तूंची पाहणी करणे आणि सुरक्षेचा दृष्टीने संरक्षित भाग स्वतःच्या अधिपत्याखाली आणणे, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातोय.

दहशतवाद्यांवर कारवाई करताना वेळप्रसंगी हेलिकॉप्टरच्या साह्याने घटनास्थळी पोहचून मदत करणे, ड्रोनच्या मदतीने आक्षेपार्ह घटना टिपणे अतिरेक्यांचा माग काढून त्यांचा बंदोबस्त करणे या संदर्भात सराव केला जात आहे.

भारत - श्रीलंका लष्करी सराव

विविध ठिकाणी पेरण्यात आलेली भुसुरुंगे ओळखणे, ती निकामी करण्याकरिता विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करणे. सार्वजनिक ठिकाणी पेरण्यात आलेली भूसुरुंग प्रसंगी खबरदारी घेणे याबाबत जवानांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.

भारत - श्रीलंका लष्करी सराव

या युद्ध सरावात भारताची 11 कुमाऊ बटालियन सहभागी झाली असून, श्रीलंकेची जेमुनू वॉच बटालियन सहभागी झाली आहे.

भारत - श्रीलंका लष्करी सराव

दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या ड्रील एकत्रित करत संयुक्त ड्रीलद्वारे ऑपरेशन राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारत - श्रीलंका लष्करी सराव

जागतिक शांततेसाठी अशा प्रकारच्या सरावांचा उपयोग होऊ शकेल.

Last Updated : Dec 6, 2019, 11:15 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

Pune

ABOUT THE AUTHOR

...view details