महाराष्ट्र

maharashtra

इंदापुरात आजी-माजी मंत्री आमने-सामने; ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार लक्षवेधी

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील निवडणुका या चुरशीच्या होणार असल्याचे चित्र आहे.

By

Published : Jan 9, 2021, 7:28 AM IST

Published : Jan 9, 2021, 7:28 AM IST

इंदापुरात आजी-माजी मंत्री आमने-सामने
इंदापुरात आजी-माजी मंत्री आमने-सामने

बारामती (पुणे)- राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील काही दिग्गज नेते मंडळींनी आपापल्या भागातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी कसून प्रयत्न केले. मात्र त्यांना मोजक्याच ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका या चुरशीच्या होणार असल्याचे चित्र आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहेत. कारण या ठिकाणी आजी माजी मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


57 ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक.......

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सर्वच निवडणुका चुरशीच्या ठरत आहेत. विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर तालुक्यावर असणारी पकड, इंदापूर तालुक्यातील एकूण 60 ग्रामपंचायती करिता निवडणूक होणार होती. त्यापैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 52 ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सध्या इंदापूर तालुक्यातील 57 ग्रामपंचायत मध्ये 558 ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता 1357 उमेदवार आपले भवितव्य आजमवत आहेत.

भरणेवाडी खेचण्यासाठी हर्षवर्धन पाटील सज्ज.....

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री बिरोबा ग्राम विकास पॅनल विरुद्ध भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनलमध्ये चुरस निर्माण होणार आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे भरणे यांच्या मैदानात ग्रामपंचायत खेचण्यासाठी सज्ज झाले आहेत.

निवडणुका होणार चुरशीच्या........

भरणे आणि पाटील यांच्यात नेहमीच चुरशीचे राजकारण पाहण्यास मिळते. अनेकदा भरणे यांनी बावडा येथे जाऊन पाटील यांना तर पाटील यांनी भरणेवाडी अंथूर्णे गावात जाऊन भरणे यांना ललकरण्‍याचा प्रयत्न केला आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत भरणे गटाची भरणेवाडी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता होती. यंदा भरणे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आव्हान केले होते. मात्र पाटील यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज असल्याने अपवाद वगळता तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करता आलेल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार हे निर्विवाद आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details