महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Rain : भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ - पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरु असल्याने याच पाऊसात भीमा व भामा खोऱ्यातील दोन धरणे व कुकडी प्रकल्पातील पाच धरणे, अशी एकूण सात महत्त्वाची धरणे आहेत.

धरण
धरण

By

Published : Jul 23, 2021, 7:52 PM IST

Updated : Jul 23, 2021, 8:35 PM IST

पुणे -उत्तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमा भामा खोऱ्यात गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. भीमा खोऱ्यातील चासकमान धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली असून धरणाचा एकूण पाणीसाठा 53 टक्क्यांवर पोहचला आहे.

धरण स्थितीचा आढावा घेतांना प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरु असल्याने याच पाऊसात भीमा व भामा खोऱ्यातील दोन धरणे व कुकडी प्रकल्पातील पाच धरणे, अशी एकूण सात महत्त्वाची धरणे आहेत. ही सर्व धरणे गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरली आहे. पुढील काळामध्ये पावसाची संततधार अशीच सुरू राहिली, तर सातही धरणे लवकरच शंभर टक्के भरतील आणि पुणे, अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा समस्या सुटले.



उत्तर पुणे जिल्ह्यातील धरणे व त्यांची पाणीपातळी

भामा आसखेड- 64 टक्के, चासकमान- 53 टक्के,

कुकडी प्रकल्पातील धरणे

येडगाव धरण- 51 टक्के, माणिकडोह धरण- 26 टक्के, वडज धरण -49 टक्के, पिंपळजोगे धरण- 23 टक्के, डिंबा धरण-51 टक्के.

Last Updated : Jul 23, 2021, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details