महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

IT Raid : पुण्यात प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर आयकर विभागाचा छापा - देवेंद्र शहा छापे

आयकर विभागाने (Income Tax Raid) उद्योजक देवेंद्र शहा (Devendra Shah) यांच्या पराग मिल्क उद्योग समुहावर (Parag Milk Foods) छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून राज्यातील बड्या नेत्यांच्या संदर्भातील उद्योगांवर छापे टाकण्याचे सत्र सुरूच आहे.

income tax department
आयकर विभाग

By

Published : Nov 25, 2021, 4:12 PM IST

Updated : Nov 25, 2021, 4:45 PM IST

पुणे -आयकर विभागाने (Income Tax Raid) आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे उद्योजक देवेंद्र शहा (Devendra Shah) यांच्या पराग मिल्क उद्योग समुहावर (Parag Milk Foods) छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या चार टीमने हे छापे टाकले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • आयकर विभागाचे धाडसत्र सुरू -

गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून राज्यातील बड्या नेत्यांच्या संदर्भातील उद्योगांवर छापे टाकण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यानच्या काळात अजित पवारांच्या निकटवर्तीयाच्या उद्योगांवरही आयकर विभागाने छापे टाकले होते. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघातील उद्योजकावर छापेमारी सुरू असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

  • आयकर विभागाकडून तपासणी सुरुच -

पराग मिल्क, गोवर्धन उद्योग समुहाचे दूध उत्पादनात जगभरात जाळं आहे. अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने आयकर विभागाची कारवाई सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे.

आयकर विभागाकडून तपासणी सुरू -

दरम्यान, मंचर येथील पराग डेअरीमध्ये पहाटे 2 वाजून 15 मिनिटांनी आयकर विभागाने छापा मारला, तर अवसरी येथील पीर डेअरीमध्ये पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी छापा मारला. देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी सकाळी 7 वाजता तर देवेंद्र यांच्या मित्राच्या घरी सकाळी 9 वाजता छापा मारला. आयकर विभागाकडून तपासणी सुरुच आहे.

हेही वाचा -NCB Raid : एनसीबीचा नांदेडात छापा, जप्त केले एक क्विंटल अफूची बोंडे

Last Updated : Nov 25, 2021, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details