दौंड(पुणे)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित उद्योग, साखर कारखाने यांची आज केंद्रीय पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्याची देखील तपासणी या केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात येत आहे याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही .
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दौंड शुगर साखर कारखान्यावर केंद्रीय तपास यंत्रणाचे तपासणी पथक कारखाना स्थळी दाखल झाले आहे. सदर पथकाकडून कारखान्याच्या मुख्य ऑफिस मध्ये चौकशी करण्यात येत आहे. सदर कारखान्याच्या ऑफिसच्या गेटवर सीआरपीएफ जवानांचा पहारा आहे. कारखान्यात आत जाण्यास अथवा बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आय़कर विभागाकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे.मात्र याबाबत अस्पष्टता आहे.
बारामती काटेवाडीतही तपासणी -