पुणे- राज्यात पडलेल्या दुष्काळाचा फटका वन्यप्राणी-पक्ष्यांनाही बसत आहे. जंगलात निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे तेथील पशू पक्षी मानवीवस्तीत येऊ लागले आहेत. त्याच प्रकारे हिरव्यागार जंगलात आपला सुंदर पिसारा फुलवून नाचणारा मोर आता मानवीवस्तीत येऊन घराच्या छतावर नाचू लागला आहे. शिरुर तालुक्यातील कवठे यमाई या गावात अशा प्रकारचे हे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या गावातील मुलांनी आता 'नाच रे मोरा आंब्याच्या वनात' असे न म्हणता 'नाच रे मोरा घराच्या छतावर' असे गाणे म्हणले तर त्यात काही नवल वाटणार नाही.
VIDEO : नाच रे मोरा घराच्या छतावर..! पाण्याच्या शोधात मोरांचा लोकवस्तीत वावर वाढला
हिरव्यागार जंगलात आपला सुंदर पिसारा फुलवुन नाचत बाघडणार मोर आता शिरुर तालुक्यातील कवठे यमाई येथील गावातील एका घराच्या छतावर येऊन पिसरा फुलवुन अगदी मनमुग्धपणे नाचत आहेत.
देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचे जंगलातील वास्तव्य अगदी तुरळक होत आहे. हाच मोर अन्न पाण्याच्या शोधात लोकवस्तीत येऊ लागला आहे. नागरिकही त्याचे स्वागत करुन त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करत आहेत. त्यामुळे मोरही माणसाळले असून त्यांचा यमाई या गावात नित्याचा वावर आहे.
जंगलात मोरांच्या वास्तव्यासाठी वनविभागाकडुन व्यवस्था करण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोर लोकवस्तीत येत आहेत. मात्र या मोरांना लोकवस्तीत धोका निर्माण होऊ शकतो याकडे गांभिर्याने पहाण्याची गरज आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र गारवा पसरला आहे त्यामुळे मोरही या वातावरणाचा नाचत बागत मनमोग्ध आनंद घेत आहेत.