पुणे: 21 वर्षीय तरुणीने या प्रकाराबद्दल तक्रार दिल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी अमित प्रेमचंद सिटलानी (Director Premchand Sitlani) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार मे 2017 पासून 26 मार्च 2022 पर्यंत सुरू होता अशी माहिती त्या तरुणीने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय पीडित तरुणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करते. तर अमित सिटलानी हा दिग्दर्शक म्हणून काम करतो. एका मित्राच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. आरोपी अमित सिटलानी याने पीडितेला मे २०१७ मध्ये पुण्यातील टिंगरे नगर येथील मित्राच्या फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी नेले.
Director Rapes Actress : पुण्यात दिग्दर्शकाने अश्लील व्हिडिओ बनवत अभिनेत्रीवर केला वारंवार बलात्कार - दिग्दर्शक प्रेमचंद सिटलानी
अभिनेत्री तरुणीवर बलात्कार (Actress raped ) झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. दिग्दर्शकाने पार्टी देतो म्हणून पीडित तरुणीला मित्राच्या फ्लॅटवर बोलवत तिथे बलात्कार केला. नंतर तीचा अश्लील व्हिडिओ बनवत ( making pornographic videos) तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार (director repeatedly raped the actress) केला या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
त्याच फ्लॅटवर आरोपीने तरुणीला तुझी बदनामी करेल असे सांगत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने या तरुणीचा एक अश्लील व्हिडिओ ( making pornographic videos) देखील बनवला. नंतर 2018 पासून आरोपी हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी त्या तरुणीला बोलवून सतत तिचा बलात्कार करत होता. पुण्यातील विविध हॉटेलवर घेऊन जाऊन पिडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. यावेळी आरोपीने पीडीतेला मारहाण देखील केली. माझे इंडस्ट्रीमध्ये हजारो फॉलॉवर आहेत तुझी बदनामी करेन अशी धमकी आरोपी पीडितेला वारंवार देत होता. सतत होणार्या या अत्याचारामुळे अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत आरोपी अमित सिटलानी ज्याच्या विरोधात पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली यावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.