पुणे - जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना मागणीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांना अजूनही रेमडेसिवीचा तुटवडा भासत आहे.
जिल्ह्यातील 626 खासगी कोविड रुग्णालयांमध्ये 16 हजार 68 ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. येथील कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्रशासनामार्फत सोमवारी पाच हजार 65 रेमडेसिवीचा पुरवठा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात रेमडेसिवीचा तुटवडा लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच, त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली शहरी भागात सहा आणि ग्रामीण भागात 12 भरारी पथके कार्यरत आहेत. या भरारी पथकांमार्फत रुग्णालय स्टॉकिस्ट आणि वितरक यांच्याकडील रेमडेसिवीरची उपलब्धता आणि त्याचा वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून खासगी कोविड रुग्णालयांना समान तत्त्वावर रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येत आहे. या खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडील बेड्सच्या प्रमाणात रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार गरजू रुग्णांसाठीच या इंजेक्शनचा वापर करावा, अशी विनंती विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील सोमवारची रेमडेसिवीर पुरवठा स्थिती :
पुणे जिल्ह्यात मागणीच्या प्रमाणात निम्म्यापेक्षा कमी रेमडेसिवीर उपलब्ध - पुणे रेमडेसिवीर इंजेक्शन
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना मागणीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांना अजूनही रेमडेसिवीचा तुटवडा भासत आहे.
![पुणे जिल्ह्यात मागणीच्या प्रमाणात निम्म्यापेक्षा कमी रेमडेसिवीर उपलब्ध Remedesivir injection](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11632173-708-11632173-1620071394449.jpg)
Remedesivir injection
खासगी रुग्णालये : 623
ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स : 16 हजार 68
रेमडेसिवीर उपलब्ध : 5 हजार 65