पुणे - पुण्यातील एका व्यापाऱ्याला ऑनलाईन सेक्सचा मोह भलताच महागात पडला आहे. एका तरुणीने व्यापाऱ्याला व्हॉट्सअॅपवरून नग्न व्हिडिओ कॉल केला. तिने व्यापाऱ्यासोबतचा नग्नावस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या व्यापाऱ्याकडून तब्बल 18 हजार रुपये उकळले. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अनोळखी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नग्नावस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करून उकळले पैसे
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की संबंधित व्यापारी पुण्यातील मुंढवा परिसरात राहतो. जानेवारी 2021 मध्ये त्याची सोशल मीडियावर एका अनोळखी तरुणीशी मैत्री झाली होती. या तरुणीने ऑनलाईन सेक्स करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याचा व्हॉट्सअॅप नंबर घेतला. व्हॉट्सअॅपवरून तिने नग्न व्हिडिओ कॉल केला. शिवाय, तिने व्यापाऱ्यासोबतचा नग्नावस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केली. व्यापाऱ्यानेही भीतीपोटी वेळोवेळी पेटीएमद्वारे एकूण 18 हजार रुपये दिले.
तरुणीच्या त्रासाला कंटाळलेल्या व्यापाऱ्याची पोलिसांकडे धाव